शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मूल आदर्श तालुका करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:03 IST

मूल शहर आणि तालुक्यात विकासाची विविध कामे पुर्णत्वास येत असून लवकरच महाराष्ट्रातील आदर्श तालुक्याचे स्थळ म्हणून मुलची ओळख निर्माण होईल असा विश्वास वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : इको पार्कचा लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मूल शहर आणि तालुक्यात विकासाची विविध कामे पुर्णत्वास येत असून लवकरच महाराष्ट्रातील आदर्श तालुक्याचे स्थळ म्हणून मुलची ओळख निर्माण होईल असा विश्वास वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्ट रोजी मुल येथे खनीज विकास निधीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या इको पार्कच्या उदघाटन सोहळयात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुल नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले, नगर परिषदेचे अध्यक्ष नंदू रणदिवे, पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदू मारगोनवार, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुलचे मुख्याधिकारी सरनाईक, सेवानिवृत्त उपविभागीय वनाधिकारी धाबेकर आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मूल शहर व तालुक्यातील नागरिकांनी माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. मूल शहरात कर्मवीर मा.सा. कन्नमवारांचे स्मारक व सभागृह, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे बांधकाम पुर्णत्वास आले असून शहरात सीसीटीव्ही सर्व्हेलंस सिस्टीम स्थापित करण्यात आली आहे.सहा कोटी रू. निधी खर्चुन तालुका क्रीडा संकुल तयार होणार असून ११ कोटी रू. किमतीच्या आठवडी बाजाराच्या कामालासुध्दा लवकरच सुरुवात होणार आहे. शहराच्या मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले आहे.मूल शहरातील अत्याधुनिक बसस्थानक हे शहराचे वैशिष्ट ठरणार आहे. लवकरच मूल हे २४ तास नळाचे पाणी देणारे शहर ठरणार आहे. ग्रामीण भागातही विकासाची विविध कामे वेगाने सुरू असून चिचडोह प्रकल्प २०१८ पर्यंत सुरू होणार आहे. माजी मालगुजारी तलावासाठी १५० कोटी रुपयांचा निधी शासनाने दिला आहे. मागेल त्याला विहीर या योजनेचा लाभ शेतकºयांना दिला आहे. अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. याकरिता पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यात प्रत्येक गावात शुध्द पाण्याची आरो मशिन लावण्यात येणार आहे. कुकुटपालनाचे पहिले केंद्र मूल तालुक्यातच सुरू होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून उत्तम रस्ते तालुक्यात तयार करण्यात येणार आहे. मूल तालुका व शहर या राज्यातील आदर्श शहर व तालुका म्हणून लौकिक प्राप्त करेल, यावर आपला भर राहणार असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.या इको पार्कमध्ये स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन तसेच २५ सप्टेंबर दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मदिनी नि:शुल्क प्रवेश दिला जाईल, असेही ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.उल्लेखनीय असे की खनिज विकास निधीच्या माध्यमातून दोन कोटी ९८ लाख रुपयांचा निधी खर्चुन बांधण्यात आलेल्या इको पार्कचे उदघाटन यावेळी एका शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते करण्यात आले. या इको पार्कमध्ये पशुपक्ष्यांचे स्टॅच्युज उभारण्यात आले असून आकर्षक पध्दतीने इको पार्कचे बांधकाम करण्यात आले आहे. या पार्कमुळे मूलवासीयांना आता सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी चांगले वातावरण मिळणार आहे. यावेळी सेवानिवृत्त उपविभागीय वनाधिकारी धाबेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठया संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.