शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या घोषणांवर विश्वास ठेवू नका

By admin | Updated: August 7, 2016 00:44 IST

१० वर्षे सेवा करणाऱ्या अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात येईल,

अंगणवाडीसेविकांचा मेळावा : शासनाविरूद्ध प्रचंड संतापबल्लारपूर : १० वर्षे सेवा करणाऱ्या अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी केली होती. मात्र ही घोषणा हवेत विरली असून अंगणवाडी महिलांची फसवणूक केली गेली आहे. मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी व्यक्त केले. बल्लारपुरात अंगणवाडी महिलांचा मेळावा रेखा रामटेके यांच्या अध्यक्षखाली घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दहिवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात वंदना मुळे म्हणाल्या, देशातील सर्व कामगार संघटनांना किमान वेतन १५ हजार रुपये मिळावे, ही मागणी सतत लावून धरली. मागील वर्षी २ सप्टेंबरला याच प्रमुख मागणीला घेऊन देशव्यापी संप झाला होता. मात्र शासनाने आश्वासन देऊन महिलांची बोळवण केली, असे सांगितले.गतवर्षी २ सप्टेंबरला देशातील सर्व कामगार कर्मचारी संघटनांच्या वतीने देशव्यापी संप झाला होता. येणाऱ्या २ सप्टेंबरलाही देशातील सर्व कामगार कर्मचारी संघटनांच्या वतीने देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. पोकळ घोषणावर विश्वास ठेवू नका व संपात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. दहीवडे यांनी केले. वर्षा आत्राम यांच्या आभार प्रदर्शनाने मेळावा संपला. मेळावा यशस्वी करण्याकरिता सारिका कामतवार, मंजुषा चुरे, कुंदा पावडे, अल्का लिडवे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)