शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महाऔष्णिक केंद्रात गुरे सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:21 IST

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या युनिट क्र. १ ते ९ एडीपीएल व उर्जानगर वसाहत परिसरात मोकाट गुरे-ढोरे व पाळीव जनावरांचा वावर वाढल्यामुळे बऱ्याचदा कर्मचारी व पाल्यांचा अपघात झाला. मोकाट अथवा पाळीव जनावरांमुळे विद्युत केंद्राच्या परिसरात पट्टेदार वाघ व इतर हिंसक प्राण्यांचा वावर वाढण्याची शक्यता आहे. भविष्यातील संकट लक्षात घेऊन पशुपालकांनी या परिसरात गुरे सोडू नये, असे आवाहन चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्याच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या युनिट क्र. १ ते ९ एडीपीएल व उर्जानगर वसाहत परिसरात मोकाट गुरे-ढोरे व पाळीव जनावरांचा वावर वाढल्यामुळे बऱ्याचदा कर्मचारी व पाल्यांचा अपघात झाला. मोकाट अथवा पाळीव जनावरांमुळे विद्युत केंद्राच्या परिसरात पट्टेदार वाघ व इतर हिंसक प्राण्यांचा वावर वाढण्याची शक्यता आहे. भविष्यातील संकट लक्षात घेऊन पशुपालकांनी या परिसरात गुरे सोडू नये, असे आवाहन चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्याच्या वतीने करण्यात आले आहे.चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात अंभोरा, खैरगाव, पद्मापूर, मीनगाव, आगरझरी, म्हसाळा, तुकूम आदी गावातील सरपंचांना त्यांच्या अधिनस्थ परिसरातील पाळीव व मोकाट जनावरे आपल्या ताब्यात घेण्याकरिता प्रशासनातर्फे पत्र देण्यात आले होते. याशिवाय प्रत्येक गावामध्ये दवंडी पिटविण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या प्लांट, एडीपीएल आणि वसाहत परिसरात पट्टेदार वाघीण तिच्या तीन शावकासह आणि इतर हिंसक प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला आहे. हा परिसर जंगलाला लागून असल्याने वन्यप्राण्यांचा सतत संचार सुरू असतो.सदर परिसरात असलेल्या पाळीव व मोकाट जनावरांचा वावर हिंसक प्राण्यांना निमंत्रण देण्यासारखा ठरू शकते. त्यामुळे ही जनावरे कोणत्याही परिस्थितीत विद्युत केंद्रातील वसाहतीबाहेर काढण्याबाबत मुख्य वनसंरक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत सांगण्यात आले होते.पाळीव व मोकाट जनावरे जिल्हाधिकाºयांच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे महानगरपालिका चंद्रपूर यांच्यातर्फे विद्युत केंद्र व वसाहतीच्या बाहेर काढण्यात येणार आहे. जंगलाला लागून असणाºया परिसरात जनावरे असल्यास वन्य प्राण्यांकडून धोका निर्माण होऊ शकतो.चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील विद्युत केंद्राच्या लगत असलेल्या अंभोरा, खैरगाव, पद्मापूर, किटाळी, मीनगाव, आगरझरी, म्हासाळा, तुकूम आदी गावांतील सरपंचांनी पशुपालक शेतकºयांना माहिती देऊन ही जनावरे केंद्र परिसरात आणण्यास मज्जाव करण्याचे सीटीपीएसतर्फे कळविण्यात आले.