शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

झोपडपट्टीधारकांना बेघर करू नका

By admin | Updated: May 29, 2017 00:36 IST

येथील बसस्थानकाजवळील तलावाचे सौंदर्यीकरण व खोलीकरणाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे.

झोपडपट्टीधारकांची मागणी : सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कमूल : येथील बसस्थानकाजवळील तलावाचे सौंदर्यीकरण व खोलीकरणाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. खोलीकरणातून निघालेली माती तलावाला लागून असलेल्या झोपडपट्टीधारकांच्या झोपड्याजवळ टाकली जात आहे. पाटबंधारे विभागाने सौंदर्यीकरणाचा विषय समोर करून झोपडपट्टीधारकांना नोटीस देवून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. यामुळे झोपडपट्टीधारकांनी आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत कुमरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून आम्हाला बेघर करू नका, अशी मागणी केली.मूल व परिसरातील गरीब नागरिक येथील भु.मा.क्रं. ८६८ याठिकाणी अतिक्रमण करून झोपड्या बांधुन राहात आहेत. झोपडपट्टीधारकांनी मामा तलावाच्या जागेवर किंवा पाळीवर अतिक्रमण करून झोपड्या बांधलेल्या नाही किंवा सौंदर्यीकरणाच्या कामास अडचण निर्माण होईल, असे काहीही कृत्य केलेले नाही. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही वर्षापूर्वी या ठिकाणाचा सर्व्हे केला. परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. पाटबंधारे विभागाने कामाला सुरूवात करण्याआधी जागेचे सिमांकन केलेले नाही आणि कामाला सुरूवात केली. जोपर्यंत जागेचे सिमांकन होत नाही, तोपर्यंत झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे सदर झोपडपट्टी कायमस्वरूपी करा, अशी मागणी भागवत कुमरे व झोपडपट्टीधारकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक पारधी, भावेश गोहणे, सचिन बल्लावार, नितील कावळे, मधुकर मोहुर्ले यासह अनेक झोपडपट्टीधारक उपस्थित होते.