शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:40 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजूर कर्ज खात्यावर ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज बँकांनी वसूल करु नये.

ठळक मुद्देसहकार मंत्र्यांचे निर्देश : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सहकार विभागाचा आढावा

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजूर कर्ज खात्यावर ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज बँकांनी वसूल करु नये. याबाबत राज्यस्तरावर एसएलबीसीच्या बैठकीमध्ये बँकांनी व्याज वसूल करु नये, असा निर्णय झालेला असून या निर्णयाचे सर्व बँकांनी तंतोतंत पालन करण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शनिवारी सहकार विभागाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, सहकार विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रवीण वानखेडे, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक एम. व्ही. पोटे, सहकार क्षेत्रातील संबंधित विविध अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यात असलेल्या पगारदार व नागरी सहकारी पतसंस्थांनी त्यांना मिळणाऱ्या नफ्यातील २० टक्के रक्कमेची गुंतवणूक करुन जिल्ह्यात सहकारी तत्वावर रुग्णालय उभारून गरीब व दूर्बल घटकातील नागरिकांना उत्तम सेवा देण्याचे कार्य करावे, असे आवाहनही सहकार मंत्री देशमुख यांनी केले. या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचा आढावा घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०० विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना नवीन व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या सूचना केल्या. यामुळे सोसायट्या सक्षमीकरणाचा शासनाचा उद्देश सफल होईल, असे ते म्हणाले. अटल पणन महाअभियानांतर्गत ज्या विकास संस्थांची व्यवसायासाठी निवड करण्यात आली आहे. त्या संस्था योग्यरित्या कार्यान्वित होण्याकरीता सर्व अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीत ना. देशमुख यांनी कर्जमाफी, बाजार समिती, सहकारी संस्था यासह विविध विषयाचा आढावा घेतला.जिल्ह्यात ९१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभचंद्रपूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँक मिळून थकीत कर्ज असणारे शेतकरी, प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणारे लाभार्थी व एकरकमी योजनेंतर्गत लाभ देण्यात आलेले शेतकरी असे एकूण ९१ हजार १५७ कर्जमाफीस पात्र लाभार्थ्यांना ३५१ कोटी २२ लाख रुपयांचा लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली.