रामदेगीत येणाऱ्या भाविकांकडून प्रवेश शुल्क आकारू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:25 AM2021-01-21T04:25:41+5:302021-01-21T04:25:41+5:30

चिमूर : वरोरा ते चिमूर मार्गावरील रामदेगी देवस्थान परिसरातील जागा वनविभागाने ताब्यात घेतल्याने भाविकांना त्या ठिकाणी जाण्याकरीता प्रवेश शुल्क ...

Do not charge entrance fee from devotees coming to Ramdegit | रामदेगीत येणाऱ्या भाविकांकडून प्रवेश शुल्क आकारू नका

रामदेगीत येणाऱ्या भाविकांकडून प्रवेश शुल्क आकारू नका

Next

चिमूर : वरोरा ते चिमूर मार्गावरील रामदेगी देवस्थान परिसरातील जागा वनविभागाने ताब्यात घेतल्याने भाविकांना त्या ठिकाणी जाण्याकरीता प्रवेश शुल्क आकारल्या जात होते. शिवाय, विश्वस्त मंडळाला तेथे बांधकाम करण्यास मज्जाव करण्यात आला होता. याविरुद्ध देवस्थान समितीने तालुका न्यायालयात धाव घेतल्याने भाविकांकडून प्रवेश शुल्क आकारण्यास मनाई करून वनविभागाच्या कारवाईला न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) गणेश तौर यांनी स्थगिती दिली आहे.

रामदेगी देवस्थान हे प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वाचे प्रतीक असल्याची श्रद्धा आहे. येथील शिवमंदिरात नियमित पूजाअर्चा होते. दरवर्षी मोठी यात्राही भरते. निसर्गरम्य परिसर आणि वन्यप्राण्यांच्या संचारामुळे शासनाने नुकतीच या परिसराला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत बफर झोन म्हणून मान्यता दिली. एक गेटही सुरू केले. त्यामुळे भाविक आणि पर्यटकांना त्या ठिकाणी जाणे अवघड झाले होते. रामदेगी देवस्थानाचे विश्वस्त हनुमंत कारेकर यांनी देवस्थानाच्या धर्मशाळेच्या बांधकामाला मंजुरी मिळावी, सौरऊर्जा संयंत्र लावण्यास परवानगी द्यावी आणि भाविकांकडून कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारू नये, अशी याचिका वरोरा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केली होती. याची दखल घेत दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) गणेश तौर यांनी वनविभागाला स्थगन आदेश देत याचिकाकर्त्यांच्या तीनही मागण्यांची दखल घेऊन पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे धर्मशाळेच्या बांधकामाचा मार्ग व पर्यटनातील अडचणी दूर झाल्या आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. बाबा कारेकर यांनी काम पाहिले.

Web Title: Do not charge entrance fee from devotees coming to Ramdegit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.