शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणे बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:20 IST

शेतकऱ्यांनी स्वत:च्या जमिनी वेकोलिला दिल्या़ मात्र वेकोलिने प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नोकरीत सामावून घेतले नाही.

ठळक मुद्देवामनराव चटप : पोवनी येथे आंदोलन; तीन तास वाहतूक रोखली

आॅनलाईन लोकमतगोवरी : शेतकऱ्यांनी स्वत:च्या जमिनी वेकोलिला दिल्या़ मात्र वेकोलिने प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नोकरीत सामावून घेतले नाही. पोवनी २ व ३ या कोळसा खाणींचे भूमिपूजन एकाच वेळी केले. परंतु पोवनी ३ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलिने नोकरीत घेतले नाही. हा अन्याय असून स्वत:च्या जमिनी देऊनही नोकरी व योग्य मोबदला मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागत असेल तर हे सरकार गरिबांच्या कामाचे नाही़ हा अन्याय तातडीने बंद करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केली़ पोवनी फाट्यावर शुक्रवारी रास्ता रोखो आंदोलनाप्रसंगी आयोजित सभेत केला़यावेळी अ‍ॅड़ चटप पुढे म्हणाले, की सरकार शेतकºयांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेताना दिसत नाही. शेतकºयांना केवळ अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून मोदी सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. शेतमालाला तोकडा दर असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतमालाना उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव द्यावा, सर्व शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज संपवून सरसकट कर्जमाफी करावी राजुरा- भोयगाव, नारंडा- पोवनी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. विरुर (गाडेगाव) कोलमाईन्समध्ये राहिलेल्या १७ टक्के शेतकºयांच्या जमिनी वेकोलिने घेऊन शेतकºयांना नोकरीत सामावून घ्यावे. यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात पोवनी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले़ केला. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी राजुरा- कवठाळा मार्गावरील वाहतूक तीन तास रोखून धरली होती. आंदोलनामुळे वाहतूक प्रभावित झाली़ वेकोलितून कोळसा वाहतूक शेकडो ट्रक दोन्ही बाजूला उभा होत्या़आंदोलन स्थळी कोणतीही अनुचित घटना घऊ नये म्हणून ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात राजुरा पोलिसाचा ताफा दाखल झाला होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शेखर देशमुख आंदोलनस्थळी दाखल झाले होते. मात्र, शेतकºयांनी सरकारविरोधी घोषणा देऊन वातावरण दणाणून सोडले़शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर दिवे, शेषराव बोंडे, बाजार समितीचे सभापती हरिदास बोरकुटे, शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख बाबा पाटील कावळे, दशरथ बोबडे, मारोतराव लोहे, दत्तुजी ढोके, गणेश काळे, बंडू जुनघरी, सुरज जिवतोडे, प्रमोद लांडे, सचिन निखाडे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले उपस्थित होते.५० आंदोलनकर्त्यांना अटक व सुटकाशेतकरी संघटनेने पोवनी फाट्यावर केलेल्या रास्तारोको आंदोलनात शेतकरी नेते व माजी आमदार अ‍ॅड. चटप यांच्यासह जवळपास ५० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली़ ठाण्यात हजर केल्यानंतर े काही वेळेत सुटका केली़