शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विकास कामे जलद गतीने करा

By admin | Updated: November 17, 2014 22:49 IST

जिल्हा ग्रामीण विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी जलद गतीने करा, अशा सूचना केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी अंमलबजावणी यंत्रणेला दिल्या.

अहीर यांच्या सूचना : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची आढावा बैठकचंद्रपूर : जिल्हा ग्रामीण विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी जलद गतीने करा, अशा सूचना केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी अंमलबजावणी यंत्रणेला दिल्या.ना. अहीर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत जिल्हा स्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरूनुले, आमदार नाना शामकुळे, अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, ईश्वर मेश्राम, सविता कुडे व प्रकल्प संचालक अंकुश केदार उपस्थित होते.या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, संपूर्ण ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, भूमिअभिलेख्यांचे संगणकीकरण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे मार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजना, राजीव गांधी राष्ट्रीय ग्रामीण विद्युतीकरण योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, इंदिरा आवास योजना, मागास क्षेत्र अनुदान निधी व प्रशासकीय खर्च या बाबींचा आढावा अध्यक्षांनी या बैठकीत घेतला.तत्पूर्वी २३ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत विचारलेल्या मुद्यांच्या अनुपालनावर चर्चा करण्यात आली. मागील बैठकीचे इतिवृत्त अध्यक्षांच्या परवानगीने कायम करण्यात आले. यावेळी बोलताना अध्यक्ष म्हणाले, शासनाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना देण्यासाठी उपाययोजना करा. योजनांची अंमलबजावणी करताना यंत्रणेला जानवलेल्या अडचणी संदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे बैठकीत ठरले.कृषी वीज जोडण्या जलद गतीने देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने योग्य नियोजन करा असे त्यांनी सांगितले. या बैठकीत आमदार व सदस्यांनी विविध समस्या व प्रश्न मांडले. प्रश्न सोडविण्यासाठी यंत्रणेनी तात्काळ उपाययोजना आखाव्या अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या. बैठकीचे संचालन व आभार अंकुश केदार यांनी मानले. बैठकीस जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समितीचे सभापती व विविध खाते प्रमुख उपस्थित होते. या बैठकीनंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा आढावा ना. हंसराज अहीर यांनी घेतला. (नगर प्रतिनिधी)