शंकरपूर : एका शिक्षकाने आपल्या पत्नीच्या चौदावीचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने करीत एक आदर्श समाजापुढे ठेवला. यानिमित्त समाजप्रबोधनपर कार्यक्रम, व्यसनमुक्त व्यक्ती, दिव्यांग यांचा सत्कार केला.
शंकरपूर येथील रहिवासी असलेले व खैरी येथे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक असलेले ईश्वर सेलोरे यांच्या पत्नी संगीता यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी भारतीय संस्कृतीनुसार चौदावीचा कार्यक्रम ठेवण्यात आला. परंतु या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन त्यांनी समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला. यांनी व्यसनमुक्तीचे प्रणेते शेषराव महाराज व संतोष महाराज, शिरपूर यांचा समाजप्रबोधनपर कार्यक्रम घरीच ठेवला. जे दारू सोडून व्यसनमुक्त झाले, त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच अनाथ व दिव्यांग मुलांचाही कपडे देऊन सत्कार केला. हा सत्कार व्यसनमुक्ती संघटनेचे सचिव दिलीप सेलोकर, अशोक करंडे, जगदीश नागतोडे, वसंत नरुले, अमोद गौरकर यांच्या हस्ते करण्यात आला.