शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

दिव्यांग प्रदीपकुमारचा दहा हजार किमीचा सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 15:11 IST

आपण दिव्यांग असलो तरी काय झालं, असे म्हणत मध्य प्रदेशातील ३० वर्षीय प्रदीपकुमार सायकलने भारत यात्रेला निघाला आहे. दहा हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करून तो १८ जूनला रेकॉर्ड नोंदविणार आहे.

ठळक मुद्दे१८ जूनला नोंदविणार रेकॉर्डशरीर स्वास्थाच्या जनजागृतीसाठी भारत यात्रा

मंगेश भांडेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हीच जिद्द उराशी बाळगून आपण दिव्यांग असलो तरी काय झालं, असे म्हणत मध्य प्रदेशातील ३० वर्षीय प्रदीपकुमार सायकलने भारत यात्रेला निघाला आहे. दहा हजार किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करून तो १८ जूनला रेकॉर्ड नोंदविणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून तो अनेक मोठ्या शहरांमध्ये स्वच्छ भारत, निरोगी भारत, पर्यावरण, रस्ते सुरक्षा याबाबत जनजागृती करीत आहे.प्रदीपकुमार सेन हा सायकलने प्रवास करीत मंगळवारी चंद्रपुरात पोहोचला. यावेळी त्याने मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्याच्याकडून सुरू असलेल्या जनजागृतीची माहिती दिली. तेव्हा जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी त्याचे कौतुक केले.मुळचा मध्यप्रदेश राज्यातील इंदौर येथील रहिवासी असलेला प्रदीपकुमार सेन हा २५ वर्षांचा असताना १० आॅगस्ट २०१३ ला एका रस्ते अपघातात त्याचा डावा पाय पूर्णपणे निकामी झाला. त्यामुळे त्याला चालता येणेही शक्य नव्हते. त्यामुळे त्याने कृत्रिम पाय बसवून घेतले. रस्ते अपघातात आपला पाय निकामी झाला, असे अनेक अपघात देशात घडतात आणि अनेकांना अपंगत्व येते. त्यामुळे यावर जनजागृती झाली पाहिजे, यासाठी त्याने भारत यात्रा करण्याचा निश्चय केला.१४ नोव्हेंबर २०१७ ला त्याने इंदौर येथून भारत यात्रेला सुरूवात केली. त्याची ही यात्रा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामीलनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडीसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यातून दिल्ली येथे पोहोचणार आहे. १८ जूनला ही यात्रा पूर्ण होवून दहा हजार किमी सायकल प्रवासाचा येथे रेकॉर्ड नोंदविला जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रातील अनेक मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रदीपकुमारने ‘लोकमत’शी बोलताना दिली.दिवसभरात शंभर ते दीडशे किमीचा प्रवासएका पायाने दिव्यांग असूनही कृत्रिम पायाच्या बळावर प्रदीपकुमार सायकलद्वारे भारत यात्रेला निघाला आहे. डोक्याला हेल्मेट व पाठीवर जवळपास २५ ते ३० किलो वजनाची विविध साहित्य असलेल्या बॅग आहे. या यात्रेदरम्यान अनेक मोठ्या शहरातील मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या भेटी घेवून तो स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, पर्यावरण, रस्ते सुरक्षेचा संदेश देत आहे. दिवसभरात शंभर ते दीडशे किमीचे अंतर पार करीत असल्याचे त्याने ‘लोकमत’ला सांगितले.रस्ते सुरक्षा अभियानाचा अ‍ॅम्बेसेडरया अभियानाला सुरूवात करण्यापूर्वी प्रदीपकुमारने अनेक केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. एका पायाने दिव्यांग असलेल्या प्रदीपकुमारची जिद्द पाहून अनेकजण थक्क झाले. अशातच केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाच्या प्रमुख राणी निगोंट यांनी प्रदीपकुमारला रस्ते सुरक्षा अभियानाचा अ‍ॅम्बेसेडर बनविण्याची इच्छा व्यक्त केली. सायकलद्वारे १० हजार किलोमीटरची भारत यात्रा पूर्ण होताच प्रदीपकुमारची रस्ते वाहतूक विभागाचा अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती होणार असल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य