शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

परंपरागत शेतीला फाटा देत संदीपची मत्स्य व्यवसायात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:28 IST

राजू गेडाम मूल : धानाचे पीक घेण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केल्यानंतरही लावलेला पैसा व मिळालेले उत्पन्न यांची ...

राजू गेडाम

मूल :

धानाचे पीक घेण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केल्यानंतरही लावलेला पैसा व मिळालेले उत्पन्न यांची गोळाबेरीज केल्यानंतर वर्षभरातील मेहनत वाया जात असल्याचे निदर्शनास येताच परंपरागत शेतीला फाटा देत मत्स्य व्यवसायात उंच भरारी घेत या व्यवसायातून लाखो रुपये उत्पन्न घेत आहे.

मूल तालुक्यातील हळदी गावगन्ना येथील संदीप नंदाजी भुरसे असे या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे. लहानशा खेड्यामध्ये मत्स्य व्यवसायात उत्तुंग भरारी घेतल्याने त्याच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होताना दिसत आहे.

जिद्द, चिकाटी व परिश्रम या बळावर अशक्य ते शक्य करून दाखविता येते, हेच मूल तालुक्यातील हळदी गावगन्ना या छोट्याशा गावातील युवक संदीप भुरसे यांनी कृतीतून दाखविले आहे.

परंपरागत शेतीत या तरुणाचे मन रमत नसल्याने त्याने परंपरागत शेतीला बगल देत शेतीत काहीतरी नावीन्यपूर्ण करावे व लाखोंचे उत्पन्न मिळावे या उद्देशाने मनात जिद्द, चिकाटी निर्माण केली. या बळावर त्याने परिश्रम घेऊन मत्स्य व्यवसाय करण्याचे ठरविले. शासनाचे कुठलेही अर्थसाहाय्य न घेता स्वतःचे भांडवल उभे करून आपल्या शेतात दीड एकरमध्ये दोन मत्स्य तलाव निर्माण केले. मत्स्य व्यवसायात त्याने रोहू, कटला, ग्लास, शिपनर, नीलगर या पाच प्रजाती वापरल्या. यावर त्याने दोन लाख रुपये खर्च करून या व्यवसायामधून तो आज वार्षिक सहा लाख रुपये कमवीत आहे. यावरच या तरुणाचे समाधान न झाल्याने त्यांनी मत्स्य तलावाच्या कडेच्या बांधावर बागायती शेती करण्याचा उपक्रम राबविला. या बांधावर त्यांनी वांगे, वाल, तूर, भेंडी व इतर पिके घेत असून यापासूनही तो हजारो रुपये कमवीत आहे.

बॉक्स

कुठलेही प्रशिक्षण नाही

मत्स्य व्यवसायासाठी संदीपने कुठलेही प्रशिक्षण घेतले नाही. जशा समस्या आल्या, त्या पाहून व्यवसायात सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. यातून कुटुंबाचा आर्थिक प्रश्न मिटला असून अनेक नावीन्यपूर्ण योजना शेतात राबविण्याचा त्याचा मानस आहे. शेतात मत्स्य व्यवसाय करीत असताना कुटुंबातील इतर सदस्यांचा आधार घेत त्यांनाही या कामात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मत्स्य व्यवसायात पैशाची लागत कमी असल्याने व अधिक नफा मिळत असल्याने परंपरागत शेतीसोबत मत्स्य व्यवसाय करावा, असा त्याचा तरुण शेतकऱ्यांना संदेश देत आहे.

बॉक्स

शासकीय योजना व प्रोत्साहनाची गरज

शेतकरी व होतकरू तरुण मंडळींना मत्स्य व्यवसायात शासकीय मदत मिळत नसल्याने संदीपने खंत व्यक्त केली आहे. शासनाने मत्स्य व्यवसायातील योजना गोरगरीब होतकरू तरुण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यास मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या क्षेत्रात भविष्यात परंपरागत शेतीसोबत चित्र बदललेले दिसेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.