शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बंधारे बांधण्याचा धडक कार्यक्रम राबविणार

By admin | Updated: August 17, 2015 00:44 IST

पडणारे पाणी चालवा, चालणारे पाणी थांबवा व थांबणारे पाणी जिरवा, असा संदेश देत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शाश्वत शेतीसाठी जिल्हाभरात बंधारे बांधण्याचा...

सुधीर मुनगंटीवार : गिलबिली येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजनबल्लारपूर : पडणारे पाणी चालवा, चालणारे पाणी थांबवा व थांबणारे पाणी जिरवा, असा संदेश देत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शाश्वत शेतीसाठी जिल्हाभरात बंधारे बांधण्याचा धडक कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती गिलबिली येथील जलयुक्त शिवार जलपूजनप्रसंगी दिली. लोकसहभागातून शासनाने जलयुक्त शिवार महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या जलपूजन कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे, उपविभागीय कल्पना निळ-ठुबे व उपविभागीय कृषी अधिकारी काचोळे उपस्थित होते.लोकसहभागातून जलयुक्त शिवार हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सरकारने हाती घेतला असून या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात तीन हजार ६१३ कामे पूर्ण झाली आहेत. यातून मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला असून याद्वारे शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचनसुद्धा केले आहे. ही बाब पाहता शासनाने एकाचवेळी एकाच दिवशी राज्यभर जलपूजन करण्याचा कार्यक्रम राबविला. बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली येथे जलयुक्त शिवारमधून तयार करण्यात आलेल्या बोडीत साठलेल्या पाण्याचे जलपूजन आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठविण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जलयुक्त शिवार कार्यक्रमाला नागरिकांनी स्वत:चा कार्यक्रम समजून राबवावे, असे आवाहनही मुनगंटीवार यांनी यावेळी केले. (शहर प्रतिनिधी)