शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या भारत बंद समर्थनार्थ काँग्रेसचे जिल्हाभरात धरणे, उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 23:30 IST

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी मागील १०० दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक शेतकरी शहीद झाले आहेत. केंद्र सरकारने आधी चर्चेचा देखावा केला. मात्र, आता या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर अनेक आंदोलने करण्यात आली. खासदार राहुल गांधी यांनी पंजाब, हरियाणा या राज्यात ट्रॅक्टर  रॅली काढून सहभाग दर्शविला आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय कृषी काय‌द्यांचा विरोध : केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारच्या तयार केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी भारतबंद पुकारला होता. या बंदच्या समर्थनार्थ जिल्हाभरात काँग्रेसतर्फे धरणे व उपोषण करण्यात आले. केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करून भाजप सरकार विरूद्ध नारेबाजी करण्यात आली. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पुढाकारातून येथील गिरनार चौकात शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी मागील १०० दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक शेतकरी शहीद झाले आहेत. केंद्र सरकारने आधी चर्चेचा देखावा केला. मात्र, आता या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर अनेक आंदोलने करण्यात आली. खासदार राहुल गांधी यांनी पंजाब, हरियाणा या राज्यात ट्रॅक्टर  रॅली काढून सहभाग दर्शविला आहे. काँग्रेसच्या पुढाकारातून सुमारे ६० लाख शेतकऱ्यांच्या  स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवून कृषी विधेयके रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. आंदोलनात ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, कामगार नेते के. के. सिंग, विनोद दत्तात्रय, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, महिला काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, नम्रता ठेमस्कर, गोपाल अमृतकर, संतोष लहामगे, प्रशांत दानव, ललिता रेवल्लीवार, कुणाल चहारे, हरीश कोतावार, राजेश अडूर, रोशन पचारे, पवन आगदारी, सोहेल शेख, रुचित दवे व अन्य उपस्थित    होते.

प्रहार सेवकांनी स्वतःच्या रक्ताने राष्ट्रपतींना लिहले पत्रवरोरा : किसान भारत बंद समर्थनार्थ आणि कृषी कायदे रद्द करण्यासाठी प्रहार पक्षातर्फे रक्तदान करून प्रहार सेवकांनी स्वतःच्या रक्ताने राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पत्र पाठविले. शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ रक्तानेच पत्र लिहून शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. जिल्हासंपर्क प्रमुख गजू कुबडे यांच्या मार्गदर्शनात किशोर डुकरे,अमोल बावणे,जगदीश लांडगे, नितीन नागरकर,संदीप झाडे, हर्षल धोके, आकाश उताणे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसMorchaमोर्चा