शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

जिल्ह्यात रेती खनन आणि वाहतुकीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:22 IST

महसूल व वनविभागाने ३० मार्चपासून तीन महिने मुदतीकरिता ई-टेंडरिंग प्रक्रियेद्वारे जवळपास २९ रेतीघाटांचा लिलाव केला. रेतीघाट मिळालेल्या कंत्राटदारांनी रेती उत्खनन व वाहतूक सुरु केली, मात्र २ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सगळ्यांच्या अपेक्षांवर विरजण पडले आहे.

ठळक मुद्देबांधकामांवर निर्बंध : कंत्राटदारांना पहावी लागणार नव्या आदेशाची वाट

रत्नाकर चटप ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदा : महसूल व वनविभागाने ३० मार्चपासून तीन महिने मुदतीकरिता ई-टेंडरिंग प्रक्रियेद्वारे जवळपास २९ रेतीघाटांचा लिलाव केला. रेतीघाट मिळालेल्या कंत्राटदारांनी रेती उत्खनन व वाहतूक सुरु केली, मात्र २ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सगळ्यांच्या अपेक्षांवर विरजण पडले आहे. सध्या रेती खनन आणि वाहतुकीला स्थगितीचे आदेश दिले आहे.उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांच्याकडील रिट याचिकेनुसार भंडारा जिल्ह्यामध्ये ७ डिसेंबर २०१८ च्या आदेशाचे उल्लंघन करुन रेतीघाटाचे लिलाव केल्याचे म्हटले आहे. यात एकूण २० प्रतिवादी असून त्यात भंडारा जिल्हाधिकाऱ्यासह चंद्रपूर व इतर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अंतिम केलेले व करारनामा तसेच ताबा दिलेल्या रेतीघाटातून रेतीचे उत्खनन चालू ठेवावे की, नाही? याबाबत अपर सचिव, महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय यांच्या आदेशाची व मार्गदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे. मार्गदर्शन प्राप्त होतपर्यंत रेतीघाटांतील उत्खन व वाहतूक पुढील आदेशानपर्यंत बंद करण्यात आले आहे.याबाबत आदेश हाती येताच रेतीघाट, घेणाºया कंत्राटदारांची चांगलीच दमछाक झाली असून लाखो रुपये खर्च करुन मिळालेल्या रेतीघाटाचे करायचे तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पावसाची भीतीसध्या उन्हाळा चांगलाच तापत असला, तरी एक महिन्यानंतर पावसाळा सुरु होणार आहे. रेतीघाटातून वाहतूक बंदीचे आदेश असल्याने रेती काढणे बंद झाले आहे. मात्र कंत्राटदारांना पावसाची भीती असून केवळ एक महिन्यात रेती कशी काढायची, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.रेतीघाटाला स्थगिती आल्याने रेतीघाटातून पुन्हा अवैध रेतीउत्खनन होण्याची शक्यता आहे. सध्या गाव तसेच शहरांमध्ये रेतीची बांधकामासाठी अधिक गरज आहे.

टॅग्स :sandवाळू