शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा व्यसनमुक्त करणार

By admin | Updated: November 29, 2014 23:17 IST

दारूबंदी करणे हा समाजाच्या हिताचा निर्णय असून यासाठी सर्व जिल्हावाशियांच्या सहकार्याची गरज आहे. जिल्ह्यात दारूबंदी सोबतच व्यसनमुक्त करण्याचा निर्धार असल्याचे मत अर्थ नियोजन व

सुधीर मुनगंटीवार : व्यसनमुक्तीच्या प्रसार प्रसिद्धीसाठी चार कोटींची तरतूदचंद्रपूर : दारूबंदी करणे हा समाजाच्या हिताचा निर्णय असून यासाठी सर्व जिल्हावाशियांच्या सहकार्याची गरज आहे. जिल्ह्यात दारूबंदी सोबतच व्यसनमुक्त करण्याचा निर्धार असल्याचे मत अर्थ नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित व्यसनमुक्ती कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी, सभापती ईश्वर मेश्राम, देवराव भोंगळे व सविता कुडे आदी उपस्थित होते.दारूबंदी नंतर उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने तत्पर राहावे असेही त्यांनी सांगितले. व्यसनमुक्तीचे कायदे अंमलात आणले पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहतांना नमूद केले. अशी आठवण करून देत मुनगंटीवार म्हणाले, आता ती वेळ आली आहे. जिल्ह्यात व्यसनमुक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी समाज कल्याण विभागासाठी पुरवणी मागण्यामध्ये चार कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.आपला जिल्हा महाराष्ट्राची प्रेरणा झाली पाहिजे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. दारुबंदी नंतर व्यसनमुक्तीसाठी आरोग्य विभाग आणि सामाजिक संघटनांवर मोठी जबाबदारी येणार आहे. दारूबंदी नंतर आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहे. त्यासाठी औषधीसाठा कमी पडू दिला जाणार नाही. आरोग्यावर होणारे परिणाम व त्यासाठी लागणारी औषध यासंबंधी आरोग्य विभागाने बैठक घेऊन आढावा घ्यावा, असे त्यांनी सुचविले. यावेळी डॉ. पालीवार यांनी व्यसनमुक्ती व आरोग्य यासंदर्भात विचार मांडले. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी दारूपासून होणाऱ्या सामाजिक दुष्परिणामाचा आढावा घेतला. समाज कल्याण अधिकारी विजय वाकुलकर यांनी सामाजिक न्याय विभागाच्या व्यसनमुक्ती कार्यक्रमासंदर्भात मनोगत व्यक्त केले. पारोमिता गोस्वामी यांनी आपल्या दारूमुळे संसार उद्धवस्त झालेल्या महिलांचे अनुभव सांगितले. दारूबंदी नंतर होणाऱ्या आजाराबाबत आम्ही दक्षता घेवू तसेच व्यसनमुक्तीसाठी पूरेपूर सहकार्य करू असे त्यांनी सांगितले, (नगर प्रतिनिधी)