दिलासा : पाणी टंचाई मिटणारवरोरा : वर्धा नदीवर बंधारा बांधण्यात आल्याने नदीचा धार आटली होती. त्याचा परिणाम वरोरा शहरातील पाणी पुरवठय़ावर झाला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने हालचाली करीत बंधार्यातून पाण्याची धार सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली. यावर जिल्हाधिकार्यांनी तातडीने बंधार्यातून पाणी सोडण्याचे निर्देश दिल्याने वरोरावासीयांना दिलासा मिळाला आहे.वर्धा नदीच्या मार्डा गावानजीक एमआयडीसीने बंधारा बांधला आहे. बंधारा तात्पुरत्या स्वरुपाचा बांधावयाचा असतानाही त्यामध्ये सिमेंटचा वापर करण्यात आला. उन्हाळ्यापूर्वी बंधारा बांधून जूनच्या पहिल्या आठवड्यात तो हटविला पाहिजे. याकरिता विद्यमान पाणी पुरवठा सभापती छोटू शेख यांनी सन २0१२ मध्ये १४ दिवसांचे आमरण उपोषण केले होते. त्यावेळी कच्चा बंधारा बांधण्याचे निर्देश पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिले होते. असे असताना यावर्षी सिमेंटचा वापर करून बंधारा बांधण्यात आला. बंधार्यातील पाण्याची पातळी खालाविल्याने बंधार्यातील पाईपमधून समोर पाणी जात नाही. त्यामुळे वरोरा शहराच्या पाणी पुरवठा करणार्या नदीतील ज्ॉकवेल जवळील पाण्याचा साठा संपला. याचा परिणाम वरोरा शहरातील पाणी पुरवठय़ावर झाला आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सभापती छोटू शेख व मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकार्यांकडे बंधार्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती.(तालुका प्रतिनिधी)
नदीतील बंधार्यातून पाणी सोडण्याचे जिल्हाधिकार्यांचे निर्देश
By admin | Updated: June 7, 2014 01:41 IST