शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चित्रपटगृहे, योगा केंद्रे, जलतरण तलाव सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST

प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील फक्त राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सरावाकरिता स्विमिंग पुल्स सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच योग वर्ग, सर्व इनडोअर खेळाअंतर्गत  बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोअर शुटींग रेन्जेंस इत्यादी खेळास सामाजिक अंतर राखून मुभा देण्यात येत आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील. सिनेमाघर, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह सुरू करण्यास एकूण क्षमतेच्या ५० टक्के बैठक व्यवस्थेच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देअटींवर दिली परवानगी : चंद्रपूर जिल्ह्यातही मिशन बिगिन अगेन

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्याचे मुख्य सचिव यांच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यात ५ नोव्हेंबरपासून निर्बंध शिथील करणे व टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविणे अंतर्गत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेश निर्गमित केले आहेत. जिल्ह्यातील चित्रपटगृहे, योगा केंद्र, जलतरण तलाव, इनडोअर खेळ याला अटींवर परवानगी दिली आहे. प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील फक्त राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सरावाकरिता स्विमिंग पुल्स सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच योग वर्ग, सर्व इनडोअर खेळाअंतर्गत  बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोअर शुटींग रेन्जेंस इत्यादी खेळास सामाजिक अंतर राखून मुभा देण्यात येत आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील. सिनेमाघर, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह सुरू करण्यास एकूण क्षमतेच्या ५० टक्के बैठक व्यवस्थेच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. परंतु या सर्व ठिकाणी कोणत्याही खाण्यायोग्य वस्तुंना विकण्याची किंवा घेवून जाण्याची परवानगी राहणार नाही. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना सांस्कृतिक कार्य विभाग तथा स्थानिक प्रशासनाद्वारे लागू असतील.मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक निदेर्शांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

१५१ कोरोनामुक्त, १३२ नवे बाधितजिल्ह्यात शनिवारी १५१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर  १३२ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १६ हजार ७८६ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १३ हजार ८४३ झाली आहे. सध्या दोन हजार ६९१ बाधितांवर उपचार सुरू आहे. शनिवारी आढळलेल्या 132 बाधितांमध्ये ८७ पुरुष व ४५ महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परिसरातील ५८, पोंभुर्णा तालुक्यातील तीन, बल्लारपूर तालुक्यातील दोन,  चिमूर तालुक्यातील पाच, मूल तालुक्यातील चार, गोंडपिपरी तालुक्यातील चार, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील आठ, ब्रह्मपुरी तालुक्यातील १४, नागभीड तालुक्यातील ११, वरोरा तालुक्यातील दोन, भद्रावती तालुक्यातील नऊ, सिंदेवाही तालुक्यातील दोन, राजुरा तालुक्यातील आठ तर गडचिरोली येथील एकाचा समावेश आहे. 

तीन बाधितांचा मृत्यूशनिवारी जिल्ह्यात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्ड येथील ४६ वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील ७० वर्षीय पुरुष व भाकर्डी येथील ३८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५२ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २३६ बाधितांचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcinemaसिनेमा