शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांसाठी लाभदायी

By admin | Updated: August 26, 2014 23:20 IST

बँकाशी सामान्य जनता जुळली पाहिजे बलुतेदार, पगारदार, शेतकरी वर्ग, विद्यार्थी, महिला बचत गट यांच्यासोबतच तळागळातील दुर्बल घटकांशी बँकेने नाते जोडले पाहिजे, त्यांच्यात

जिल्हाधिकारी : रुपे डेबीट कार्डचा शुभारंभचंद्रपूर : बँकाशी सामान्य जनता जुळली पाहिजे बलुतेदार, पगारदार, शेतकरी वर्ग, विद्यार्थी, महिला बचत गट यांच्यासोबतच तळागळातील दुर्बल घटकांशी बँकेने नाते जोडले पाहिजे, त्यांच्यात विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे. या सर्व बाबी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जाणवल्या, असे मत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केले. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेद्वारे आयोजित रुपे डेबिट कार्ड शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुभाष धोटे, मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल, बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे, नाबार्ड चंद्रपूरचे सहायक महाप्रबंंधक डी.टी. डेकाटे, बँकेच्या उपाध्यक्ष प्रभाताई वासाडे, संचालक मनोहर पाऊणकर, अनिल खनके, विजय बावणे, दिलीप नलगे, संजय तोटावार, दामोधर रुयारकर, पुंडलिक कढव, प्रा. ललित मोटघरे, उल्हास करपे, पांडूरंग जाधव, नंदाताई अल्लुरवार, आयसीआयसीआय बँकेचे राजेश सराफ, ट्रस्ट सिस्टीम अ‍ॅन्ड सॉप्टवेअरचे हेमंत चाफले, वैभव कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.रुपे डेबिट कार्डच्या सहाय्याने शेतकरी पगारदार विद्यार्थी वर्ग, इतरही नागरिकांना देशाच्या कानाकोपऱ्यातून आर्थिक व्यवहार करता येईल. ही जिल्हा बँकांसाठी फार मोठी उपलब्धी आहे, असेही जिल्हाधिकारी म्हैसेकर म्हणाले. रुपे डेबिट कार्डच्या आधारे सर्वसामान्य जनता बँकेशी सलग्नित होईल. असा आशावाद आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील तिसरी बँक आहे, हा धाडसी निर्णय बँकेने घेतला आहे. अशा विविध योजनांद्वारे बँक सदोदित कार्य करीत राहील, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे यांनी बँकेच्या प्रगतीची माहिती देत भविष्यात ग्राहक व ठेविदारांना उत्तमोत्तम सेवा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल, नाबार्ड चंद्रपूरचे सहा. महाप्रबंंधक डी.टी. डेकाटे यांनीही यावेळी गौरवोद्गार काढले. संचालन प्रिती बहादुरे, आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय खेडीकर यांनी मानले. कार्यक्रमाला शेतकरी, पतसंस्थांचे अध्यक्ष, महिला बचत गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)