शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतील नोटाबंदीचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: November 17, 2016 01:47 IST

केंद्र सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारण्यावर बंदी घातली आहे.

कुठे बदलणार नोटा? : राष्ट्रीयकृत बँकांचा अभाव, ग्रामीण नागरिकांचा ३० किमीचा प्रवासआशिष देरकर  कोरपनाकेंद्र सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारण्यावर बंदी घातली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण नागरिकांची दमछाक होत असून राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखेच्या अभावामुळे नोटा बदलायचे कुठे, असा गंभीर प्रश्न ग्रामीण नागरिकांना पडला आहे.मोठ्या शहरांमध्ये राष्ट्रीयकृत बँका असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा जिल्हाभर पसरलेल्या आहेत. सहकारी बँकांच्या माध्यमातून पीक कर्जाचे वाटप होत असल्याने सामान्य शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ओळखले जाते. बहुतांश ग्रामीण नागरिकांचे खाते जिल्हा बँकांमध्ये आहे. मात्र जवळील जुन्या नोटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका स्वीकारत नसल्याने ग्रामीण लोकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत आहे.जिल्ह्यातील अनेक तालुक्यात केवळ ४ ते ५ राष्ट्रीयकृत बँका आहे. मात्र ५० टक्के लोकांचे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते नसून या बँकांमध्ये अनेक लोकांनी अजुनपर्यंत पाय ठेवलेला नाही. सुशिक्षीत लोकांना नोटा बदलविणे शक्य होत असले तरी म्हातारे, निरक्षर यांना नोटा बदलविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राष्ट्रीयकृत बँका म्हणजे काय, असा प्रश्न अनेक नागरिक करीत आहे.अनेक खेड्यातील लोकांना राष्ट्रीयकृत बँकेत जाण्याच्या सक्तीमुळे नोटा बदलविण्यासाठी ३०-३५ किलोमिटरचा प्रवास करावा लागत आहे. ५०० रुपयांची नोट बदलविण्यासाठी १०० रुपये खर्च होत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी होत आहे. अशातही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्याला बँकेतील गर्दी पाहून झोप उडत आहे. कारण खेड्यापाड्यातील सहकारी बँकांचे खातेदार राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नोटा बदलविण्यासाठी एकच गर्दी करीत आहेत. त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.धान कापणी, बांधणीची कामे उधारीवरभेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव परिसरात धान उत्पादकांकडून धान कापणी, बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र मोदी सरकारने काळ्या पैशाविरोधात बंड पुकारत १००० आणि ५०० च्या नोटा चलनातून बाद केल्याने त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या निर्णयाला आठवडा होत असला तरी आवश्यकतेनुसार नोटा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापणी, बांधणीचे कामे उधारीवर करावी लागत आहे. त्यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या मजुरांचे हाल होत आहे. यावर्षी धान कापणीची मजुरी परवडत नसल्याने स्थानिक मजूर वर्ग कापूस वेचणीच्या कामासाठी बाहेरगावी स्थलांतरीत झाल्याने कापणी व बांधणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहे. दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक पाऊस पडल्याने शेतकरी समाधानी होता. मात्र धानपिकांवर यावर्षी रोगाचे प्रमाण वाढल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला. महागड्या औषधांची फवारणी करूनही काहींना रोगावर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. नवीन धानाचे भाव अद्यापही निश्चित झालेले नाही. तरी धानाला अडीच हजार रुपये क्विंटल हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)पूर्ण दिवस जातो बँकेतनोटा जरी बदलल्या असल्या तरी अजुनही जुन्याच नोटांवर अनेकांचे व्यवहार सुरू आहे. अनेकांनी जुन्या नोटा वापरून जुने देणी परत करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे दररोजच व्यवहार होत असल्याने एक दिवसाआड बँकेत नोटा बदलीसाठी जावे लागत आहे. यामुळे सारा दिवस बँकेत रांगेत लागण्यात जात आहे.आधारबाबत जनजागृती नाहीदुर्गम भागातील नागरिक अजुनही फक्त बँक पासबुक किंवा जुन्या नोटा घेऊन बँकेत पोहचत आहेत. आधारकार्डबाबत जनजागृती नसल्याने आधारकार्ड न आणताच बँकेत येत आहे. त्यामुळे अशांना आल्यापावली परत जाऊन दुसऱ्या दिवशी आधारकार्ड घेऊन बँकेत यावे लागत आहे. त्यानंतरही बँकेच्या काऊंटरवर गेल्यास झेरॉक्स द्यावी लागत असल्याने रांगेत लागलेला नंबर मागे पडतो. पाचशे द्या, चारशे घ्या३०-३५ किमी अंतरावर जाऊन नोटा बदलविण्यासाठी बँकेत रांगेत लागून राहणे खर्चीक व वेळखाऊ ठरत असल्याने अनेकजण पाचशे रुपये घेऊन चारशे रुपये परत करीत आहेत. त्यामुळे मेहनतीचे पैसे वाया जात असल्याचे नागरिक सांगतात. सहकारी बँका म्हणतात, आरटीजीएस कराग्रामीण भागातील जनतेला आरटीजीएस काय आहे अजून माहित नाही. जिल्हा सहकारी बँकांना पैसा न पोहोचल्याने ते ग्राहकांची मागणी पूर्ण करू शकत नसल्याची स्थिती आहे. अशातच तुमच्या खात्यातील रक्कम आरटीजीएस करून राष्ट्रीयकृत बँकेतून रक्कम उचला, असा सल्ला देण्यात येत आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकेचे खातेदार नसल्याने आरटीजीएसच्या सुविधेला अनेकांना मुकावे लागत आहे.