शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

पालक सचिवांच्या तासिकेने जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 05:00 IST

ज्यांची ड्यूटी पूर नियंत्रण कक्षात लावली. ते खरेच तेथे उपस्थित राहतात की नाही, याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट द्यावी. गैरहजर आढळल्यास कारवाई करावी. या कालावधीत कोणालाही दीर्घ रजा देऊ नये. अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात पुरेसा औषधसाठा ठेवून कोविड लसीकरणाकडेही लक्ष द्यावे, अशाही सूचना पालक सचिवांनी केेल्या. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातून सहा-सात नद्यांना पूर येतो. गोसेखुर्द व संजय गांधी सरोवरातून पाणी सोडल्यास नदीकाठच्या गावांना फटका बसतो. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीत सर्व यंत्रणांनी समन्वय राखावा आणि पूर नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवावा, अशा सूचना अपर मुख्य सचिव (सहकार व पणन) तथा जिल्ह्याचे पालक सचिव अनुप कुमार यांनी गुरूवारी आढावा बैठकीत दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम उपस्थित होते. पालक सचिव अनुप कुमार म्हणाले, ज्यांची ड्यूटी पूर नियंत्रण कक्षात लावली. ते खरेच तेथे उपस्थित राहतात की नाही, याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट द्यावी. गैरहजर आढळल्यास कारवाई करावी. या कालावधीत कोणालाही दीर्घ रजा देऊ नये. अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात पुरेसा औषधसाठा ठेवून कोविड लसीकरणाकडेही लक्ष द्यावे, अशाही सूचना पालक सचिवांनी केेल्या. बैठकीचे सादरीकरण जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

बँकांवर कारवाई करा खरीप कर्ज वाटपा त राष्ट्रीयीकृत बँकांची कामगिरी फारच निराशाजनक आहे. ३१ जुलैपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्यावे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र कर्ज वाटपात चांगले काम केले. पीक कर्जवाटपाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बँकर्सचा नियमित आढावा घ्यावा. ज्या बँका चांगले काम करणार नाही, त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना पालकसचिवांनी दिल्या

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी