शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३२ हजार ९५२ घनमीटर गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:24 IST

शासनाच्या गाळयुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक तलाव-बोड्यांमधील गाळ उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

ठळक मुद्देलाभ घ्यावा : गाळयुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाच्या गाळयुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक तलाव-बोड्यांमधील गाळ उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मागील वर्षात ३२ हजार ९५२ घनमीटर गाळ उपसा झाला होता. तर चालू आर्थिक वर्षात या मोहिमेचा बुधवारपासून शुभारंभ करण्यात आला असून नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा अव्वलस्थानी आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अनेक तलावामधील गाळीचा उपसा झाला नव्हता. त्यामुळे तलावातील पाणी साठवण क्षमता कमी झाली. परिणामी पावसाळा संपताच तलावातील जलसाठ्यात घट होत होती. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना कार्यान्वित केली. या योजनेतून २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातील २२ तलावातील गाळ काढण्यात आला. त्यातील ३२ हजार ९५२ घनमीटर गाळीचा उपसा करण्यात आला. उपसा केलेला गाळ शेतकºयांनी स्वत:च्या शेतात टाकला. गाळ काढण्यात आलेल्या तलावामध्ये चंद्रपूर तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. बल्लारपूर, राजुरा, कोरपना, चिमूर, मूल या तालुक्यातील प्रत्येकी एक, गोंडपिपरी-चार, भद्रावती, नागभीड तालुक्यातील दोन तर ब्रह्मपुरी तालुक्यात तीन तलावातील गाळ उपसा करण्यात आला.गाळ काढण्यावर जवळपास ९ लाख ८८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला असून या कामांना लोकसहभाग मोठ्या प्रमाणात मिळाला. यंदा जवळपास ५० तलावातील गाळ उपसा केला जाणार असून जेसीबी मशीनद्वारे गाळ उपसा केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी स्वत:चे वाहन लावून आपल्या शेतात गाळ टाकावा असे आवाहन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना फायदातलावातील निघालेला गाळ शेतकºयांना शेतात टाकण्यासाठी प्रशासनाकडून सवलत दिली जात आहे. शेतकऱ्यांने स्व:ताचे वाहन करून गाळ उचलावे. वाहतुकीसाठी लागणारा डिझेलचा खर्च जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.