शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

जिल्ह्यात १९३ पाणी नमुने फ्लोराईड बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा अंतर्गत जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याकरिता उपलब्ध स्त्रोतांचे पाणी नमुने तपासणी केली जाते. पाण्यातील फ्लोराईड व दूषित पाण्याचे प्रमाण किती, याचे निकष ठरविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देप्रयोगशाळेचा अहवाल। चिमूर तालुक्यात सर्वाधिक नमुने दूषित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा व उपविभागीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेत जानेवारी २०२० रोजी तपासणी केलेल्या ४ हजार २४० पाणी नमुन्यांपैकी १९३ पाणी नमुने फ्लोराईड बाधित आढळले आहेत.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा अंतर्गत जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याकरिता उपलब्ध स्त्रोतांचे पाणी नमुने तपासणी केली जाते. पाण्यातील फ्लोराईड व दूषित पाण्याचे प्रमाण किती, याचे निकष ठरविण्यात आले आहेत. चंद्रपूर तालुक्यातील तपासलेल्या ५६ पाणी नमुन्यांपैकी ५ फ्लोराईड बाधित नमुने आढळले आहे. बल्लारपूर तालुक्यात ७० पैकी ५, राजुरा तालुक्यात ३२६ पैकी १८, कोरपना ३७८ पैकी १०, भद्रावतीत १८१ पैकी १४ नमुने फ्लोराईड बाधित आढळून आले आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यात ४१२, नागभीड ८४, गोंडपिंपरी येथील ३४८ पाणी नमुन्यांपैकी सर्वच पाणी पिण्यायोग्य तर पोंभुर्णा तालुक्यामधील २८२ पैकी ८ पाणी नमुने फ्लोराईड बाधित आढळले आहेत.वरोरा तालुक्यात ५०३ पाणी नमुने तपासल्यानंतर ४० पाणी नमुने फ्लोराईड बाधित, चिमूर तालुक्यात ४५७ पैकी ३५, सावली ३६९ पैकी १७, मूल येथे ४०२ पाणी नमुने तपासल्यानंतर ३६ नमुने तर सिंदेवाहीत ३७२ पैकी १४ फ्लोराईड बाधित पाणी नमुने आढळले. दूषित नमुन्यांची टक्केवारी ४.५५ टक्के आहे.दूषित नमुन्यांची टक्केवारी ४.५५फ्लोराईडबाधित पाण्याची तपासणी केल्यानंतर जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग व कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून अशा स्त्रोतांबाबत विशेष खबरदारी घेतली जात आहे. दूषित नमुन्यांची टक्केवारी ४.५५ टक्के असून ती वाढणार नाही, यासाठी उपाययोजना सुरू आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद