जिल्ह्यातील मान्यवर, अतुल देशकर समर्थक यांच्यासह हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत उदासा (ता. उमरेड) व कोसंबी गवळी (ता. नागभीड) या संघांमध्ये अंतिम सामना पार पडला. यात चार चेंडू राखत उदासा संघाने कोसंबी गवळी संघाचा पराभव करत माजी आमदार चषक २०२१ स्पर्धेत बाजी मारली.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, भाजपा ओबीसी आघाडी प्रदेश कार्य. सदस्य प्रा.प्रकाश बगमारे, जि.प समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, माजी सभापती संतोष तंगडपल्लीवार, जि.प सदस्य दीपाली मेश्राम, भाजपा जिल्हा सचिव माणिक पाटील थेरकर यांच्या हस्ते विजेते संघ व वैयक्तिक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. एकूण ५३ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून शहरी व ग्रामीण अशा दोन गटात स्पर्धा खेळविण्यात आली. प्रथम पारितोषिक स्व. शांताताई देशकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ २१,००० रोख व चषक युसीसी संघ उदासाने पटकावला, तर द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती नागराज गेडाम यांच्याकडून १५,००० व चषक विद्यार्थी क्रीडा मंडळ कोसंबी गवळीने जिंकला. स्व.बेबीताई पेंढरकर स्मृती चषक ९,००० रोख व चषक उल्हास अडबे यांच्याकडून असेलेले तिसरे पारितोषिक चिचखेडा संघाने जिंकले. कार्यक्रमाला पं. स. सभापती तथा स्पर्धेचे आयोजक प्रा. रामलाल दोनाडकर, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष वंदना शेंडे, सिंदेवाही पं.स सदस्य रितेश अलमस्त, पं. स सदस्य प्रकाश नन्नावरे, पं.स सदस्य नीलकंठ मानापुरे, प्रशांत समर्थ, जेष्ठ नेते अरुण शेंडे, सुधीर सेलोकर आदी उपस्थित होते. संचालन प्रा.यशवंत आंबोरकर यांनी केले तर आभार भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर यांनी मानले.