शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

१२२ दिव्यांगांना सायकलींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 06:00 IST

शासनाच्या अटल स्वावलंबन मिशन योजनेंतर्गत समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद व सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील १२२ दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंचलित तीनचाकी सायकलींचे वाटप सोमवारी करण्यात आले.

ठळक मुद्देमार्गदर्शन मेळावा : समाजकल्याण विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाच्या अटल स्वावलंबन मिशन योजनेंतर्गत समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद व सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील १२२ दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंचलित तीनचाकी सायकलींचे वाटप सोमवारी करण्यात आले.सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात आयोजित सायकल वितरण व मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन आमदार डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार, नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राजेश पांडे, जि.प. सदस्य रमेश बारसागडे, जात पडताळणी कार्यालयाच्या संशोधन अधिकारी पुष्पलता आत्राम, अपंग कल्याण संघटनेचे जिल्हा सचिव प्रकाश मारबते, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना विविध योजनाचा लाभ देण्यासाठी प्रशासन कटिबध्द आहे. दिव्यांग बांधवांनी जागृत राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. नगराध्यक्ष योगीता पिपरे म्हणाल्या, शरीरातील एखाद्या अवयवाने अपंगत्व असले तरी दिव्यांग नागरिकांमध्ये सामर्थ्य असते. काही तरी करण्याची जिद्द असते. दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे. आपण नगर पालिकेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी व त्यांच्या सन्मानासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन पिपरे यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश पेंदाम, संचालन राजू वडपल्लीवार, आभार पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक