शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. चा अर्थसंकल्प 37 कोटी 83 लाखांच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 23:30 IST

राज्य शासनाकडून जमीन महसूल उपकर, सापेक्ष अनुदान आणि मुद्रांक कराचा निधी न मिळाल्याने नसल्याने त्याचे परिणाम २०२१-२२ च्या मूळ अंदाजपत्रकावर दिसून आले. अनेक विभागातील निधीला कात्री लावण्याची वेळ पदाधिकारी आणि अधिकाºयांवर आली आहे. अर्थ समितीचे सभापती राजू गायकवाड यांनी १० लक्ष ६ हजार १९४ रूपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. सन २०२०-२१ च्या सुधारित अंदाजपत्रकालाही या सभेत मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देनिधीअभावी बजेटला कात्री : ग्रामीण विकासाच्या योजना अडचणीत येणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत आटले असताना शुक्रवारी नियोजन भवनात आयोजित सर्वसाधारण सभेत अर्थ समितीचे सभापती राजू गायकवाड जिल्हा परिषदेचे सन २०२१-२२ चा ३७ कोटी ८३ लक्ष ५ हजार ९९४ रूपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर केला. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार ३७ कोटी ७२ लक्ष ४५ हजार ८०० रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या काही तरतुदींवर सत्ताधारी व विरोधी सदस्यांनीही आक्षेप नोंदविल्याने जि. प. वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता.राज्य शासनाकडून जमीन महसूल उपकर, सापेक्ष अनुदान आणि मुद्रांक कराचा निधी न मिळाल्याने नसल्याने त्याचे परिणाम २०२१-२२ च्या मूळ अंदाजपत्रकावर दिसून आले. अनेक विभागातील निधीला कात्री लावण्याची वेळ पदाधिकारी आणि अधिकाºयांवर आली आहे. अर्थ समितीचे सभापती राजू गायकवाड यांनी १० लक्ष ६ हजार १९४ रूपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. सन २०२०-२१ च्या सुधारित अंदाजपत्रकालाही या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेचा सन २०२१-२२ चा ३७ कोटी ८३ लक्ष ५ हजार ९९४ रूपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. तरतुदीनुसार ३७ कोटी ७२ लक्ष ४५ हजार ८०० रुपयांचा खर्च गृहित धरण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या उपस्थितीत अर्थ समितीचे सभापती राजू गायकवाड यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सत्ताधार व विरोधी सदस्यांनीही आक्षेप घेतला. सत्ताधारी गटातील जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी शून्य बजेट तर जीवतोडे यांनी खरेदी बजेट असल्याची टीका केली. काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर, चिमूरकर, गजानन बुटके यांनीही अर्थसंकल्पातील तरतुदींवर आक्षेप घेतला. 

पाणी पुरवठ्यासाठी    १३ कोटी ६३ लाखग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे देखभाल व दुरुस्तीसाठी स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करण्यात आला. १३ कोटी ६३ लाखांची तरतूद या विभागावर करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागांतर्गत मूल तालुक्यातील सोमनाथ येथे चारा बागेची निर्मिती करण्याकरिता अर्थसंकल्पात प्रथमच १९ लाखांची तरतूद करण्यात आली. 

कृषी व वैयक्तिक लाभाच्या योजना गायबमालमत्ता परिरक्षण, शिक्षण (५ टक्के), शिक्षण, बाजार   आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, समाजकल्याण अपंग कल्याण निधी, वनमहसूल अनुदान, महिला बालकल्याण, सामाजिक सुरक्षा व कल्याण, कृषी, पशुसंवर्धन, पंचायत राज  व लघु सिंचनावर ३७ कोटी ७२ लाख ४५ हजार ८०० रूपयांचा खर्च अपेक्षित  असल्याचे अर्थसंकल्पात नमुद आहे.

३७ कोटी ८३ लाख उत्पन्नाचा अंदाजशिक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, वनीकरण, कृषी विषयक कार्यक्रम, पंचायत राज कार्यक्रम आणि लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून ३७ कोटी ८३ लक्ष ५ हजार ९९४ रूपये जमा होण्याचा अंदाज नोंदविण्यात आला.अर्थसंकल्पात फक्त एकच नवीन योजनामूळ अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार सोमनाथ येथील चारा बागेची निर्मिती वगळल्यास कोणत्याही नवीन योजना राबविल्या जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे शासनाकडून निधी मिळत नसल्याने पदाधिकारी व अधिकाऱ्यांची नियोजनासाठी तारांबळ उडणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदBudgetअर्थसंकल्प