शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशन चालू न देणे हा लोकसभेचा अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:06 IST

काँग्रेसचा नेता जे बोलतात ते देशात कुणीही गांभीर्याने घेत नाही. आम्ही जनतेला गांभीर्याने घेतो. काँग्रेसने संसदेचे अधिवेशन चालू न दिल्यामुळे जनतेच्या विकासाचे मुद्दे तसेच राहिले. संसदेचा खर्च वाया गेला. हा लोकसभेचा अपमान आहे, असा आरोप केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केला.

ठळक मुद्देहंसराज अहीर : भाजपच्या उपवास कार्यक्रमात आमदारांसह अनेक सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काँग्रेसचा नेता जे बोलतात ते देशात कुणीही गांभीर्याने घेत नाही. आम्ही जनतेला गांभीर्याने घेतो. काँग्रेसने संसदेचे अधिवेशन चालू न दिल्यामुळे जनतेच्या विकासाचे मुद्दे तसेच राहिले. संसदेचा खर्च वाया गेला. हा लोकसभेचा अपमान आहे, असा आरोप केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केला.यापुढे असे होऊ देणार नाही. भाजपकडे बहुमत आहे. संसद चालू ठेवण्यात आम्हीही समर्थ आहोत. मात्र आम्ही हातापायीवर उतरणार नाही. म्हणूनच काँग्रेसच्या निषेधार्थ हा उपवास केला, असेही ना. हंसराज अहीर म्हणाले.चंद्रपूर येथील गांधी चौकात सकाळपासूनच केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर उपवास कार्यक्रमाला बसले होते. त्यांच्या समवेत वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नाना शामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, भाजप जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, चंद्रपूर महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जि.प. समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्यासह भाजपप्रणीत नगर परिषदांचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगरसेवक, जि.प. व पं.स. सदस्य उपवास कार्यक्रमात सहभागी झाले होते.देशात काँग्रेस विरोधकांनाही उचकवून लावण्याचे काम करीत आहे. सरकार विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याच्या मानसिकतेत होती. मात्र यांना संसदच चालू द्यायची नव्हती. आमच्यावर जनतेची जबाबदारी आहे. जनतेने निवडून दिलेले आहेत. विकासाच्या दृष्टीने या अधिवेशनाला महत्त्व होते. देशात सर्व सुरळीत चालू आहे. एखाद जातीय दंगलीची अप्रिय घटना देशात घडते, ती आम्हालाही मान्य नाही, असेही ना. अहीर म्हणाले.आंदोलनात अप्रिय घटना घडत असेल, तर अशी आंदोलने व्हायला नको. तरीही राईचा पहाड करण्यासाठी अशी आंदोलने केली जाते. अशावेळी शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संबंधित राज्याची असते. २ तारखेला झालेल्या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र कायदा व व्यवस्था योग्यपणे हाताळली, याकडेही ना. अहीर यांनी लक्ष वेधले. सायंकाळी ५ वाजता उपवास कार्यक्रमाची ना. हंसराज अहीर यांच्या भाषणानंतर करण्यात आली. उपवास कार्यक्रमासाठी सकाळपासूनच जिल्ह्यातील कार्यकर्ते गांधी चौकात दाखल झाले होते.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर