शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लाल्या रोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील पाच गावातील धानाची शेती उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 06:00 IST

तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी लाल्या, मावा तुडतुडा रोगाने हवालदिल झाले. या कीडींचा कहर सुरू आल्याने बंदर, खडसंगी, भानसुली, माजरा व मुरपार परिसरातील धानाची शेती उद्ध्वस्त होणयाच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देतोंडाशी आलेला घास हिरावला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे आर्थिक दुष्टचक्रात अडकलेले लहान-मोठे व्यावसायिक बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतानाच तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी लाल्या, मावा तुडतुडा रोगाने हवालदिल झाले. या कीडींचा कहर सुरू आल्याने बंदर, खडसंगी, भानसुली, माजरा व मुरपार परिसरातील धानाची शेती उद्ध्वस्त होणयाच्या मार्गावर आहे.झाडीपट्टीचा एक भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सुरूवातीपासूनच पुरेसा पाऊस झाल्याने धानाचे उत्पादन चांगले येईल, या आशेवर शेतकरी होते.

सद्यस्थितीत हलका व मध्यम धान कापणीसाठी आला आहे. मात्र जड वाणाचे धान कापण्याला २० ते २० दिवसांचा कलावधी आहे. कापणीसाठी आलेल्या धानावर लाल्या, मावा व तुडतुडा रोगाने आक्रमण केले. परिणामी, या रोगाचे बाधित क्षेत्र शेकडो हेक्टर झाल्याचे दिसून येत आहे. धानावर रोग येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक औषधी फवारणी केली. परंतु, काहीही बदल झाला नाही. त्यामुळे तोंडाजवळ आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला जाण्याची भीती वर्तवली जात आहे. असे घडल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना यंदाही कर्जातच जगावे लागणार आहे. शासनाने तालुक्यातील धान पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून भरपाई देण्याची मागणी बंडू तराळे, अशोक श्रीरामे, कवडू दडमल, वैभव गायकवाड आदी शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहेकृषी विभागाचे दुर्लक्षबंदर येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी धानावर कीडरोग प्रतिबंधात्मक फवारणी केली. मात्र याला न जुमानता मावा तुडतुडा रोगाने पुन्हा शेकडो हेक्टर क्षेत्र बाधीत केले. कीड रोगाची माहिती कृषी विभागाला देण्यात आली. मात्र कुणीही बांधावर येऊन मार्गदर्शन केले नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.कीडरोग नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली. पण उपयोग झाला नाही. अशावेळी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. याकडे कदापि दुर्लक्ष करू नये, अशा सूचना दिल्या. यंदा ब?्याच शेतकऱ्यांनी कर्ज काढून धानाची शेती केली. पीक हाती आले नाही तर जगायचे कसे हा प्रश्न सतावणार आहे.-अजहर शेख, सदस्य पंचायत समिती सदस्य, खडसंगी

टॅग्स :agricultureशेती