शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत शिक्षक संघाची सीईओंसोबत चर्चा

By admin | Updated: February 10, 2017 00:48 IST

मयत झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांची जिल्हा परिषद प्रशासनाने एक प्रकारे थट्टा चालविली

संजय झोले : मयत शिक्षकांच्या कुटुंबीयांचे दावे प्राधान्याने काढणारचंद्रपूर : मयत झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांची जिल्हा परिषद प्रशासनाने एक प्रकारे थट्टा चालविली असल्याचा आरोप करीत दोन वर्षाचा कालावधी लोटूनही कुटुंबीयांना भविष्य निर्वाह निधी, गटविमा , बचतनिधी विमा, सेवानिवृत्ती उपदान, कुटुंब निवृत्ती वेतन आदी क्लेम मिळाले नाही. त्यामुळे म.रा. प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखेने नाराजी व्यक्त करीत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) संजय झोले, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राम गारकर यांची भेट घेऊन मृत शिक्षक ओमप्रकाश शेंडे आणि विलास गंगाधर रामटेके यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली. यावेळी शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी विलास लखदिवे व शरद रामटेके यांना तात्काळ बोलावून सदर प्रकरणाकडे लक्ष देण्याविषयी सांगितले व सदर शिक्षकांचे क्लेम निकाली काढण्याची हमी दिली.दरम्यान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्य जे.डी. पोटे, सचिव किशोर उरकुंडवार यांनी ओमप्रकाश शेंडे याच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण झालेली असून सुद्धा एकही क्लेम मिळाले नसल्याने त्यांनी पंचायत समिती पोंभूर्णाच्या शिक्षण विभागाने सदर प्रकरण गांभिर्याने घेत नसल्याचा आरोप केला. पोंभूर्णा पंचायत समितीमधील संबंतिधांवर कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनातून केली. चर्चेच्या वेळी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर तर संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष जे.डी. पोटे, सरचिटणीस किशोर उरकुंडवार, उपाध्यक्ष बाबासाहेब नागरे, भक्तदास कांबळे यांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)