शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
4
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
5
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
6
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
7
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
8
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
9
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
10
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
11
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
12
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
13
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
14
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
16
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
17
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
18
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
19
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
20
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार

अपघात विम्यापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2016 00:43 IST

महाराष्ट्र शासनाची वैयक्तिक अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी १ नोव्हेंबर २०११ पासून सुरु झाली आहे.

विमा कंपनीने प्रस्ताव परत पाठविला : विजेचा शॉक लागून झाला होता मृत्यूगेवरा : महाराष्ट्र शासनाची वैयक्तिक अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी १ नोव्हेंबर २०११ पासून सुरु झाली आहे. सदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अपघात विम्याचा लाभ देण्यासाठी टाटा आयजी या विमा कंपनीकडे कृषी विभागामार्फत प्रस्ताव पाठविण्यात येतो. त्या दृष्टीने सावली तालुक्यातील अंतरगाव येथील शेतकरी वसंत जैराम ढाक हा २९ जून २०१५ रोजी शेतशिवारात असलेल्या ३३ केव्ही उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने मृत झाला होता. मात्र अद्यापही त्याला या विमा योजनेपासून वंचित ठेवले जात आहे.वसंत ढाक यांच्या अपघाती मृत्यूबाबत पोलीस प्रथम खबर रिपोर्ट, पोलीस स्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृताच्या नावे असलेला सातबारा, गावनमुना आठ अ, गावनमुना सहा फेरफार नोंदवहीचा उतारा व इतर ओळख दर्शविणारे दस्ताऐवज सादर करुन प्रस्ताव कृषी अधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आला. हा प्रस्ताव मुंबई येथील टाटा एआयजी या शासन पुरस्कृत विमा कंपनीकडे पाठविण्यात आला. सदर विमा कंपनीने ही योजना ज्यांच्या मुळ नावाने सातबारा व फेरफारच्या कागदपत्रांवर असणाऱ्या व्यक्तींसाठी लागू असल्याची सबब पुढे करुन प्रस्ताव उलट टपाली परत पाठविला. या योजनेच्या लाभापासून मृताच्या कुटुंबीयांना वंचित रहावे लागत आहे.सदर घटनेची दखल दैनिक लोकमतनी घेतली. याप्रकरणातील वापस आलेले दस्ताऐवजाची शहानिशा केली असता. मृताच्या वडिलांचे सन २००२ मध्ये वृद्धपकाळाने निधन झाले. त्यानंतर अपघातातील मृतक व इतर भाऊ हे वारस हक्काने मुले म्हणून वारसदार ठरले. कायद्याप्रमाणे वारस हक्क नोंदवही सहा क्रमांकावर फेरफार करून त्यांच्या नावे सातबारा व नमुना आठवर रितसर नोंद घेण्याची जबाबदारी संबंधित तलाठ्यांची होती. वडिलाच्या मृत्यूनंतर २००२ पासून वसंत व त्याचे भाऊ वारसाहक्काने शेतजमिनीचे मालक आहेत व तिन्ही भाऊ मिळून शेतजमीन करत होते. २९ जूनला त्यापैकी वसंत ढोक हा शेतात विजेच्या शॉक लागून मृत पावला. हे पोलीस विभाग चौकशी व शवविच्छेदन अहवालातून स्पष्टही झाले असल्याचे दिसून येत आहे. परंतु संबंधित विमा कंपनीने नेमकी शेतकरी असल्याची परिभाषा कोणत्या आधारे ठरविली कुणास ठाऊक. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाच्या अज्ञान व अशिक्षितपणामुळे महसूली दस्तऐवजात होणारे वेळोवेळचे बदल व नोंदीपासून ते अनभिज्ञ राहत आले आहे. संबंधीत विभागाचे कर्मचारीसुद्धा अशा प्रकाराची माहिती देत नाहीत. कारण काहीही असो, मात्र वसंत ढोक या शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबीयांना विमा योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. शासनाच्या योजना अनेक असल्या तरी त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्यासाठी बराच अवधी लागतो. हे डीजीटल भारताचे स्वप्न म्हणता येईल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)