शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 14:02 IST

तपासणीसाठी हलाचाली सुरु : खेडकर प्रकरणामुळे आता कारवाईची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आयएएस पूजा खेडकर प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणामध्ये बोगस प्रमाणपत्र दिल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकरणानंतर आता महाराष्ट्र राज्य सेवा (एमपीएससी) द्वारे निवड झालेल्या दिव्यांग अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातीलही बोगस दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असून, सध्या त्यांचे धाबे दणाणले आहे.

दिव्यांग प्रमाणपत्र असतानाही अनेकांनी नियम नसतानाही आरटीओ कार्यालयातून वाहन चालविण्याचा परवानाही घेतल्याचे बोलल्या जात असल्याने आता मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांमध्ये कुजबुज सुरू झाली आहे. सध्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून मोठे वादळ निर्माण झाले आहे. अशीच स्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही बोलल्या जात आहे. अनेकांनी नोकरी मिळविण्यासाठी तर काहींनी सोयीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तपासणी करून दिव्यांगांच्या हक्काच्या जागेवर ताव मारणाऱ्या या बोगस कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

या प्रकरणात मिळतात दिव्यांग प्रमाणपत्रअंध, कर्णबधिर, मूकबधिर, अस्थिव्यंग, गतिमंद, मानसिक आजार, बहुविकलांग आदी.

दिव्यांगांना मिळतात सूट त्यामुळे बोगस प्रमाणपत्र घेवून करतात फसवणूक

  • दिव्यांग कर्मचारी असेल तर शासकीय सेवेत सूट मिळते. त्यामुळे नोकरी मिळणे सोपे असते. मात्र, काही जण बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक करतात.
  • कान आणि डोळे अपंगत्व असेल तर अनेकवेळा बोगस प्रमाणपत्र असल्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चौकशी करणे गरजेचे आहे.
  • विशेष म्हणजे, जे कर्मचारी दिव्यांग आहे, त्यांना सोयीसुविधा मिळणे गरजेचे आहे. मात्र, दिव्यांग नसतानाही त्यांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी बळकावणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

सर्वाधिक प्रकरण शिक्षण विभागातशिक्षण विभागामध्ये दिव्यांग कर्मचारी किती टक्के प्रमाणात भरावे याचे शासन निर्देश आहे. असे असतानाही सध्या शिक्षण विभागामध्ये अनेक दिव्यांग कर्मचारी असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतरही विभागामध्ये बोगस दिव्यांग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर