शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरा बॅरेजला पर्यावरण खात्याची आडकाठी

By admin | Updated: December 3, 2014 22:46 IST

वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील ६३३६ हेक्टर शेतीला वरदान ठरणारा दिंडोरा बॅरेज सिंचन प्रकल्प गत पाच वर्षापासून रखडला आहे. बॅरेजच्या कामासाठी राज्य पर्यावरण खात्याची मंजूरी नसल्याने बॅरेजचे

मंगेश भांडेकर - चंद्रपूरवर्धा, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील ६३३६ हेक्टर शेतीला वरदान ठरणारा दिंडोरा बॅरेज सिंचन प्रकल्प गत पाच वर्षापासून रखडला आहे. बॅरेजच्या कामासाठी राज्य पर्यावरण खात्याची मंजूरी नसल्याने बॅरेजचे कोणतेही काम हाती घेण्यात आलेले नाही. सिंचन विभागाकडून मात्र, पर्यावरण खात्याच्या मान्यतेसाठी पाच वर्षांपासून केवळ पाठपुरावाच सुरु आहे. वरोरा तालुक्यातील सोईट-दिंडोरा गावाजवळ वर्धा नदीवर दिंडोरा बॅरेज प्रकल्प प्रस्तावित आहे. या बॅरेजची सिंचन क्षमता ६३३६ एवढी असून ४८०० हेक्टर सिंचन क्षेत्र आहे. ६ जुलै २००९ ला या बॅरेजच्या कामाला शासनाकडून मंजूरी मिळाली. बॅरेज कामासाठी शासनाने ४७६.८१ कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता दिली. मात्र, राज्य पर्यावरणण खात्याची मंजूरी न मिळाल्याने बॅरेज काम रखडले आहे. दिंडोरा बॅरेज बांधकामासाठी २५३७ हेक्टर जमीनीची गरज आहे. यात खाजगी ११८१.२८ हेक्टर, राजस्व १२५९.९८ हेक्टर तर ९५.८१ हेक्टर वनजमीनीची आवश्यकता आहे. बॅरेजमुळे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या तिनही जिल्ह्यातील शेतीला फायदा होणार असल्याने तिनही जिल्ह्यातील शेती बी-लॅड या उपशिर्षा अंतर्गत बॅरेज करीता घेण्यात आली आहे. यात वर्धा जिल्ह्यातील १३८५.९७ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यातील ३६८.१० हेक्टर तर चंद्रपूर जिल्ह्यातील ७८३ हेक्टर जमीनीचा समावेश आहे. या कार्यवाहीत तिनही जिल्ह्यातील ३२ गावच्या ११६७ शेतकऱ्यांच्या जमीनी जाणार आहेत. पुनर्वसनाची मात्र कोणताही अडचण नाही. दिंडोरा बॅरेज प्रकल्पाला ११ नोव्हेंबर १९९९ ला केंद्राकडून एमओईएफ पर्यावरण मान्यता असून सुधारीत पर्यावरण मान्यतेचा प्रस्ताव ५ जून २०१२ ला सचिव पर्यावरण विभाग मुंबई यांना सादर केलेला आहे. सध्यास्थितीत टीओआर क्रमांक प्राप्त असून प्रकल्पाला राज्य पर्यावरण विभागाच्या मान्यतेची प्रतिक्षा आहे. या प्रकल्पाला पर्यावरण खात्याची मंजूरी मिळाल्यास वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे.