लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी कार्यरत जिल्ह्यातील अंगणवाड्या आता स्मार्ट होणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने पोषण अभियान मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २६८४ अंगणवाडी सेविका व १०९ सुपरवायझर यांना स्मार्ट अॅड्रॉईड मोबाईल, सीम कार्डसह देण्यात येणार आहे.सदर अभिनांतर्गत अंगणवाड्या मधून बालकांसह स्तनदा गरोदर माता, किशोरवयीन मुलींना सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकातील खूजे, बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे, कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, बालकातील रक्तशय जन्मत: कमी वनजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे तसेच १५ ते ४९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्ताशयाचे प्रमाण कमी करणे सोबतच बाळाच्या जन्मानंतरचे पहिले १ हजार दिवसांपर्यंत विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. या अभियानांतर्गत पुढील तीन वर्षात अंगणवाडी केंद्र इमारतीचे बळकटीकरण केले जाईल. यात इमारत बांधकाम, बालकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय सुविधा आदी प्रभावी आरोग्यसेवा दिल्या जातील. महिलांची प्रस्तुतीपूर्वी प्रस्तुतीपश्चात आरोग्य तपासणी बालकांची आरोग्य तपासणी, लसीकरण आरोग्यशिक्षण आदीचा समावेश आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन देण्यात येणार आहेत.१५ सीडीपीओ व ७५ सुपरवायझरची नियुक्तीसदर अभियानासाठी मुंबई कार्यालय आयुक्तांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये १५ सीडीपीओ, ७५ सुपरवायझर व काही अंगणवाडीसेविकांना नागपूर येथे ‘कॉमन एप्लीकेशन सॉफ्टवेयर’ अंतर्गत मास्टर ट्रेनरच्या स्वरुपात प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर ट्रेनर अंगणवाडी सेविकांना मोबाइल व टैब चालविण्याचे प्रशिक्षण देणार आहेत.
जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे होणार ‘डिजिटलायझेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:52 IST
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी कार्यरत जिल्ह्यातील अंगणवाड्या आता स्मार्ट होणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने पोषण अभियान मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २६८४ अंगणवाडी सेविका व १०९ सुपरवायझर यांना स्मार्ट अॅड्रॉईड मोबाईल, सीम कार्डसह देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे होणार ‘डिजिटलायझेशन’
ठळक मुद्देअंगणवाडी सेविकांना मिळणार मोबाईल : पोषण अभियान मोहीम