शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘डिजिटल साक्षरता’अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

डिजिटल युगाची गरज लक्षात घेता महिलांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांसाठी ‘डिजिटल साक्षरता अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या दरम्यान स्वयंसेवी संस्थामार्फत राज्यभरात १०० कार्यशाळा घेवून महिलांना प्रशिक्षित केले जाईल. हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहिला आयोगाचा उपक्रम । तज्ज्ञ देणार विविध विषयांचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डिजिटल युगाची गरज लक्षात घेता महिलांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांसाठी ‘डिजिटल साक्षरता अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या दरम्यान स्वयंसेवी संस्थामार्फत राज्यभरात १०० कार्यशाळा घेवून महिलांना प्रशिक्षित केले जाईल. हे अभियान चंद्रपूर जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे.एक महिला शिकली की ती संपूर्ण घराला शिक्षित करते आणि सोबत इतर चार घरातील महिलांना शिक्षित करते. डिजिटल साक्षरता ही काळाची गरज आहे. म्हणूनच महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम आणि स्वावलंबी करायचे असेल तर डिजिटल साक्षर करणे गरजेचे आहे. डिजिटल साक्षरता म्हणजे रोजच्या जीवनात अर्थपूर्ण कार्य करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान समजण्याची आणि ते वापरण्याची कुठल्याही महिलेची, व्यक्तीची किंवा समाजाची क्षमता, भारताला डिजिटल सक्षम समाज बनविणे या महत्त्वाकांक्षी उद्देशाने सरकारने डिजिटल इंडिया कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यासाठी महिला आयोगातर्फे विविध स्वयंसेवी संस्था व महाविद्यालयाची मदत घेतली जाणार आहे. या संस्था राज्यभरात ५०० कार्यशाळांचे आयोजन करून महिलांना डिजिटली सक्षम करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक कार्यशाळेप्रमाणे ४० हजार रूपये अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अभियानात ग्रामीण भागातील महिलांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.कार्यशाळांमधून ग्रामीण महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाणार आहे. कार्यशाळेत डिजिटल क्षेत्रातील तज्ञांकडून महिलांमध्ये डिजिटल सेवा आणि तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागात जाऊन बचत गटातील स्मार्ट फोनधारक महिलांना कार्यशाळेत सहभागी करून घेतले जाणार आहे.प्रशिक्षणाचे स्वरूपकेवळ तोंडी मार्गदर्शनापेक्षा प्रॅक्टिकल लर्निग्जवर या कार्यशाळेत भर दिला जाणार आहे. स्मार्टफोनसारख्या डिजिटल उपकरण व इंटरनेटचा कार्यक्षम वापर, यासोबत दैनंदिन उपयोगात येणारे ‘उमंग’, ‘आपले सरकार’, ‘ई-जीईएम’, ‘आयआरसीटीसी’, ‘डिजीलॅकर’ असे महत्त्वपूर्ण मोबाईल अ‍ॅप्स आणि डिजिटल पेमेंटसाठी ‘भीम अ‍ॅप’, ‘फोन पे’ अशा अ‍ॅप्सचा उपयोग तसेच सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षण