शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील अतिक्रमणाने वाहतुकीस अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:53 IST

शहरातील काही रस्ते अजूनही वाहतुकीस सुरक्षित नाहीत. त्यामुळे लहान मुले, महिला व वयोवृद्ध नागरिक वाहतुकीसाठी दमछाक करावी लागत असते.

ठळक मुद्देशिवाजी चौक ते सावरकर चौक रस्ता : रस्ता मोकळा करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतब्रह्मपुरी : शहरातील काही रस्ते अजूनही वाहतुकीस सुरक्षित नाहीत. त्यामुळे लहान मुले, महिला व वयोवृद्ध नागरिक वाहतुकीसाठी दमछाक करावी लागत असते. अशातच शिवाजी चौक ते सावरकर चौकातील रस्त्याची अवस्था ही वर्षानुवर्षे वाहतुकीसाठी त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याला मोकळा श्वास कोण मिळवून देणार, असा प्रश्न अनेक नागरिक विचारत आहेत.शहरातील प्रमुख रस्ता म्हणून शिवाजी चौक ते सावरकर चौक या रस्त्याची ओळख आहे. हा प्रमुख रस्ता असल्याने लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत वाहतुकीसाठी उपयोगात येत असते. परंतु, वर्षानुवर्षे या रस्त्यावर विक्रेते, मोटरसायकल व मोठे वाहन तसेच दुकानदारांनी केलेले अतिक्रमण आदी कारणांनी हा रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरुन जाण्यासाठी सावधपूर्वक वाहतूक करूनच जावे लागते. रस्ते जर अतिक्रमणाने बरबटले असतील तर सुरळीत वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसून येतो. त्यामुळे येथील एका नागरिकाने प्रस्तुत प्रतिनिधीला पत्र पाठवून रस्ता मोकळा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.ही खदखद केवळ एका नागरिकाची नसून अशा अनेक नागरिकांची असल्याने या प्रश्नाला प्रशासनाने गंभीरतेने गरजेचे आहे. पण प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवून प्रश्नांची तिव्रता वाढविली जात आहे.नगर पालिका व पोलीस प्रशासन या दोघांच्याही अखत्यारीत हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्न सामंजस्याने सोडविण्याची खरी गरज आहे. पण दोघांनीही हात वर केल्याचे दिसून येत आहे. दोन्ही विभागाचे एकमेकांकडे बोट दाखविने सुुरू आहे. मात्र अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेतल्यास नागरिकांच्या सोयीचे ठरणार आहे.