शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थी अडचणीत

By admin | Updated: November 18, 2015 01:07 IST

नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा झाल्यानंतरही गुणपत्रिका न आल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

शंकरपूर : नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा झाल्यानंतरही गुणपत्रिका न आल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.नागभीड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजतंत्री व जोडारी ट्रेड आहे. हे दोन वर्षाचे कोर्स आहे, या दोनही ट्रेडसाठी सेमिस्टर पॅटर्न परिक्षा आहे. या दोनही कोर्ससाठी ३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला सत्र २०१३-१५ मध्ये चारही सेमिस्टरच्या परिक्षा झाल्यात पहिले, दुसरे व चौथ्या सेमिस्टरच्या गुणपत्रिका प्राप्त झाल्यात परंतु तिसऱ्या सेमिस्टरच्या गुणपत्रिका अद्यापही प्राप्त झाल्या नाही. तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा फेब्रुवारी २०१५ मध्ये परीक्षा झाल्यात आठ महिन्याचा कालावधी होवूनही गुणपत्रिका मिळाल्या नसल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्येला समोर जावे लागत आहे.विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर बिटीआरआय कार्यालयात नोंद करावी लागते ते नोंदही विद्यार्थी करू शकले नाही. त्यामुळे तेथून नौकरी संदर्भात मुलाखत पत्रही विद्यार्थ्यांना मिळाले नाही. या सोबतच कंपनी अथवा इतर ठिकाणी विद्यार्थी नौकरीसाठी अर्ज करु शकत नाही. या संदर्भात वारंवार प्राचार्य, शिक्षक या संबंधीत कार्यालय कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहे. शिष्यवृत्ती संदर्भातही घोळ असून अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली नाही. दोनही वर्षाची शिष्यवृत्ती अर्ज वेळेत विद्यार्थ्यांनी सादर केली. पहिल्या वर्षीची अर्धीच शिष्यवृत्ती प्राप्त झाली तर दुसऱ्या वर्षीची शिष्यवृत्ती अद्यापपर्यंत प्राप्त झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)