शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल दरवाढीने मालवाहतूक गॅसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST

वर्षभरात डिझेल ३५ रुपयांनी महागला. तो पुन्हा वाढतच आहे. वाहतूकदारांचे व कारखान्यांचे इतर माल वाहतुकीचे वार्षिक कंत्राट केले जाते. त्यासाठी काही अटी व शर्तीही असतात. मात्र, डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने त्याचे पालन करून गाड्या चालवायच्या कशा, असा प्रश्न निर्माण झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डिझेलचे दर झपाट्याने वाढू लागले. २० मार्च २०२२ पासून सुरू असलेली ही वाढ थांबायलाच तयार नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मालवाहतूक अडचणीत सापडली. अनेक ट्रॉन्सपोर्टर काही काळ व्यवसाय बंद ठेवण्याच्या मन:स्थितीत आले आहेत. दरवाढ कायम राहिल्यास वाहनांचे सुटे व जीवनाश्यक वस्तूंच्या किमती पुन्हा भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  देशातील पेट्रोलियम विपणन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेल या वाहतूक इंधनांच्या दरांमध्ये सकाळी वाढ केली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव १२०-१३० डॉलर प्रतिबॅरल पोहोचल्यानंतर ही दरवाढ अपेक्षितच होती. केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप ट्रॉन्सपोर्ट संघटनांनी केला. दहा दिवसांत  नऊ वेळा दरवाढ झाली आहे. शु्क्रवारी डिझेलचा दर प्रतिलिटर ९५.८३ रुपये नोंदविण्यात आला. ही वाढ अशीच सुरू राहिल्यास मालवाहतूक महागणार आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाला बसणार आहे.

विमा महागला अनेक विम्या कंपन्यांनीही प्रिमियममध्ये वाढ केली. डिझेलदर वाढल्याने भाजीपाला, किराणा, दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचे दर वाढले. डिझेलच्या वाढत्या दरांबाबत ट्रान्स्पोर्टर्सनी चिंता व्यक्ती केली आहे. विविध कारणांमुळे हा व्यवसाय अडचणीत आला. 

वर्षभरात डिझेल ३५ रुपयांनी महागले वर्षभरात डिझेल ३५ रुपयांनी महागला. तो पुन्हा वाढतच आहे. वाहतूकदारांचे व कारखान्यांचे इतर माल वाहतुकीचे वार्षिक कंत्राट केले जाते. त्यासाठी काही अटी व शर्तीही असतात. मात्र, डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने त्याचे पालन करून गाड्या चालवायच्या कशा, असा प्रश्न निर्माण झाला.

भाववाढीने गणिते बिघडली

कमी वाहने असलेल्या ट्रॉन्सपोर्टचालकांनी आता लांब अंतरावर वाहन पाठविणे बंद केले. डिझेल दरवाढीने आमच्या थोड्याफार फायद्याचेही गणित बिघडवून टाकले.-एस. एन. राणा, ट्रकचालक

मालवाहतुकीचे दर वाढले. त्यामुळे आता ऑर्डर घटल्या आहेत. लांब अंतरावर मालपुरवठा होत नसल्याने काही दिवस रिकामे राहावे लागत आहे. यातून आमचे नुकसान होत आहे.-रामन्ना यादव, ट्रकचालक, लालपेठ

 

टॅग्स :Dieselडिझेल