शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पारडगाववासीयांना डायरियाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:47 IST

तालुक्यातील पारडगाव येथील संपूर्ण गावकऱ्यांना शुक्रवारपासून डायरियाची लागण झाली आहे. गावातील ३० रुग्ण ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून गावातही आरोग्य विभागाकडून औषधोपचार सुरू आहे. एकाचवेळी गावकऱ्यांना डायरियाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा साहारे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सोमवारी सकाळी आरोग्य विभाग चौगान यांना सूचना देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्दे३० रूग्ण ग्रामीण रुग्णालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील पारडगाव येथील संपूर्ण गावकऱ्यांना शुक्रवारपासून डायरियाची लागण झाली आहे. गावातील ३० रुग्ण ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून गावातही आरोग्य विभागाकडून औषधोपचार सुरू आहे.एकाचवेळी गावकऱ्यांना डायरियाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा साहारे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सोमवारी सकाळी आरोग्य विभाग चौगान यांना सूचना देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.पारडगावची लोकसंख्या दीड हजार आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी दोन टाक्या बनविलेल्या असून एका टाकीत बोअवेलचे तर दुसºया टाकीत भुतीनाल्यातील शुध्द केलेले पाणी सोडले जाते. त्यानंतर सर्व गावाला नळाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. परडगावत लागलेली डायरियाची साथ दूषित पाण्यामुळे झाली असावी, असा प्राथमिक अंदाज उपचार करणाºया ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारपासून ही लागण काही नागरिकांना झाली असता या बाबीकडे नागरिकांनी फारसे लक्ष दिले नाही. परंतु सोमवारी सकाळपासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे एकच धावपळ उडाली. सोमवारी सकाळी ११ वाजता चौगान येथील आरोग्य विभागाची चमू गावात दाखल झाल्यानंतर तपासणीअंती ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी तब्बल ३० रुग्णांना भरती करण्यात आले आहे .पाण्याच्या नमुन्याची तपासणी नाहीपारडगाववासीयांकडून अधिक माहिती घेतली असता प्रशासनाकडून दर महिन्याला तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने घेतले जातात. परंतु या महिन्यात पाण्याचे नमुने तपासणी करण्यासाठी घेण्यात आले नसल्याचे तसेच येथील ग्रामपंचायत चपराशी यांचे निधन झाले असल्याने गत दोन महिन्यांपासून ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नसल्याचे गावकºयांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे मागील सात-आठ वर्षांपासून पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यात आली नसून सदर टाकीत बांबू टाकून पाहिले असता त्याठिकाणी बांबू फसतो, असेसुद्धा गावकºयांनी सांगितले.अशा प्रकारची लागण अस्वच्छता, खानपान आणि दूषित पाणी यामुळे होत असून या सर्व रुग्णांना झालेली लागण दूषित पाण्यापासूनच झाली असावी.- भाग्यश्री वºहाडे,वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी.