रमेश पाटील : धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावीचंद्रपूर : महाराष्ट्र धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने त्वरित करावी, या मागणीच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र धनगर समाजाच्यावतीने धनगर आरक्षण अंमलबजावणी मशाल मोर्चा यशवंत स्टेडियम ते विधानभवन नागपूर येथे ५ डिसेंबरला निघणार आहे.धनगर समाजाची मते घेऊन सत्तेवर येऊन दोन वर्ष लोटूनही शासनाने आश्वासनाची पूर्तता े केली नाही. त्यामुळे पिवळ्या झेंड्याखाली धनगर समाज एक झाला आहे. या मोर्चात समाज बांधवानी हातात मशाल घेऊन चांद्यापासून बांद्यापर्यंत आपसी मतभेद बाजूला ठेवून मशाल मोर्चामध्ये एकजूटीने सामील व्हावे आणि आपल्या समस्याबाबत जाब विचारावा तसेच तातडीने सरकारकडून आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. सदर मोर्चाची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून समाजाचे पदाधिकारी गावोगावी, घरोघरी जावून समाजबांधवाना आरक्षणाविषयी माहिती देत आहेत. तसेच मशाल मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत.महाराष्ट्रातील धनगर बांधवांनी मशाल मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन धनगर समाजाचे रमेश पाटील, ज्ञानेश्वर घावत, दिपक अवताडे, बाबा खरवडे, प्रा.अमित ठमके, शिरीष उगे, गणेश भुरके, गुलाबराव चिडे, राजू बाळचन्ने, संजय कन्नावार, डॉ. मर्लावार, विजय कोरेवार, सरपंच गुंताबाई कन्नावार आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)
धनगर समाजाचा मशाल मोर्चा
By admin | Updated: October 22, 2016 00:53 IST