शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

धनगर आरक्षण हिवाळी अधिवेशनानंतर निकाली निघावा - हरिभाऊ भदे

By admin | Updated: December 8, 2015 00:54 IST

भारतीय राज्यघटनेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) च्या यादीत समाविष्ट केले आहे.

भद्रावती येथे आयोजन : विदर्भस्तरीय धनगर उपवर-वधू परिचय मेळावाभद्रावती : भारतीय राज्यघटनेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) च्या यादीत समाविष्ट केले आहे. महाराष्ट्र वगळता इतर राज्यात या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू आहे. तरीही गेली ६५ वर्षे आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवले आहे. भारतभर एकच घटना असताना महाराष्ट्रातील धनगर समाज मात्र आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची चर्चा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होते. निवडणूक झाली की आरक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आरक्षणाचा मुद्दा असून बाजुलाच आहे. हिवाळी अधिवेशनात तो निकाली निघावा, असे अकोलाचे माजी आमदार हरिभाऊ भदे यांनी आयोजित भद्रावती येथे धनगर रविवारी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन केले.यावेळी धनगर आरक्षण एक सायंटिफीक प्रबोधन कार्यक्रमाचे मार्गदर्शन डॉ. बघेल यांनी प्रोजेक्टरद्वारे १९५० राज्य घटनेत धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे. राज्य शासनाच्या अनुसुचित जमातीच्या यादीत ३६ अनुक्रमांकावर ओरान ‘धनगड’ या जातीचा इंग्रजी भाषेत उल्लेख आहे. मराठी भाषेत इंग्रजीतील ‘धनगड’ हे मराठी भाषेत धनगर असे समजून या जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले देण्यात यावे. याकरिता राज्य शासनाने तसे संबंधीत कार्यालयाला निर्देश द्यावे, असे सांगून असा अहवाल केंद्र शासनातील सर्व संबंधित खात्याला पाठविण्यात यावा असे डॉ. बघेले व अ‍ॅड. एम.ए. पाचपोळ यांनी केले.याप्रसंगी अकोल्याचे माजी आमदार हरिभाऊ भदे, डॉ. बघेल, अ‍ॅड. एम.ए. पाचपोळ, धनगर युवक मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील, धनगर समाज नेते साईनाथ बुचे, जानराव घटारे, दामोधर साव, परशुराम येडे, देवराव ठमके, गुलाबराव चिडे, डॉ. शेळके प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमात समाजातील बालकांनी स्वागत गीत व नृत्य सादर केले व त्यांचा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला. उपवर-वधू यांची ५०-५० नावे नोंद करण्यात आली व त्यांनी काही उपस्थित उपवर-वधूंनी परिचय देण्यात आला. यावेळी विदर्भातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. अमित ठमके यांनी केले. संचालन प्रा. संजय बोधे यांनी तर आभार शिरीष उगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज घोरूडे, महेंद्र मस्के, संदीप बोधे यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)