संघरामगिरीवर अवतरणार धम्मबांधवांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:09 PM2019-01-30T23:09:21+5:302019-01-30T23:10:20+5:30

सम्राट अशोकांच्या काळापासून बौद्ध धम्मगुरू व अनुयायांच्या ध्यान-साधना करण्यासाठी महाप्रज्ञा साधनाभूमीत दरवर्षी ३० व ३१ जानेवारीला द्विवसीय धम्म समारंभ आयोजित केला जातो. यात देश-विदेशातील बौद्ध भिक्खूसह लाखो धम्मबांधव उपस्थित असतात. दरम्यान, बुधवारी दिवसभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील धम्मबांधवांचे जत्थे संघभूमीत दाखल होत होते. गुरुवारच्या समरोपीय कार्यक्रमाकरिता लाखो धम्मबांधव संघरामगिरीला दाखल होणार असून आयोजकांची तयारी पूर्ण झाली आहे.

Dhamvanshvarda fair is going on in Sangamagiri | संघरामगिरीवर अवतरणार धम्मबांधवांचा मेळा

संघरामगिरीवर अवतरणार धम्मबांधवांचा मेळा

Next
ठळक मुद्देआज मुख्य कार्यक्रम : बौद्ध अनुयायांच्या स्वागतासाठी साधनाभूमी सज्ज

आशीष गजभिये।
लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : सम्राट अशोकांच्या काळापासून बौद्ध धम्मगुरू व अनुयायांच्या ध्यान-साधना करण्यासाठी महाप्रज्ञा साधनाभूमीत दरवर्षी ३० व ३१ जानेवारीला द्विवसीय धम्म समारंभ आयोजित केला जातो. यात देश-विदेशातील बौद्ध भिक्खूसह लाखो धम्मबांधव उपस्थित असतात. दरम्यान, बुधवारी दिवसभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील धम्मबांधवांचे जत्थे संघभूमीत दाखल होत होते. गुरुवारच्या समरोपीय कार्यक्रमाकरिता लाखो धम्मबांधव संघरामगिरीला दाखल होणार असून आयोजकांची तयारी पूर्ण झाली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी 'मूकनायक' हे मुखपत्र काढून मुक्तीचा संग्राम लढवून समाजाला समतेचा सूर्य दाखविला. याच दिनाच्या स्मरणार्थ व महामानवाच्या कार्याचे स्मरण पुढील पिढीला करून देण्यासाठी व महामानवाला अभिवादन करण्यासाठी मागील २५ वर्षांपासून महाराष्ट्र उपासक-उपसिका संघाच्या वतीने संघभूमीत पहाडीवर दोन दिवसीय धम्म समारंभाचे आयोजन केले जाते.
मागील आठवडाभरापासून या अखंड सुत्तपठण या संघभूमीत सुरू असून द्विवसीय समारंभाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम या ठिकाणी सुरू असून गुरुवारी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाकरिता लाखोंच्यावर धम्मबांधव धम्म समारोहात समाविष्ट होऊन महामानवाला अभिवादन करून एक नवी ऊर्जा घेऊन जातात. गुरुवारच्या मुख्य कार्यक्रमाला हजारो अनुयायी उपस्थित राहणार आहेत.
संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन
धम्म समारोहासाठी विविध भागातून उपस्थित असणाऱ्या धम्माबांधवांकरिता परिसरातील गावात सामाजिक प्रबोधनपर संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संघरामगिरीला येणाऱ्या लाखो अनुयायांना आयोजक व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून पहाडावरील मुख्य कार्यक्रमस्थळी २४ तास पिण्याचे पाणी व भोजनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
सफाईकरिता स्वयंसेवक
दोन दिवस संघभूमीत विविध कार्यक्रम असतात. त्यामुळे या ठिकाणी समता सैनिक दल व परिसरातील विविध सामाजिक संघटनाकडून परिसरात स्वच्छता करण्यात येत असून आयोजकांकडून अस्थायी स्वरूपाची शौचालय व स्नानगृहे उभारण्यात आली आहेत. संघभूमीत येणाऱ्या लाखो अनुयायांच्या आरोग्याची जबाबदारी विविध वैद्यकीय संघटनाही घेतली असून २४ तास सेवा पूरविण्याकरिता कार्यक्रम स्थळावर तंबू उभरण्यात आले आहेत.

Web Title: Dhamvanshvarda fair is going on in Sangamagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.