शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भीमशक्तीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

By admin | Updated: February 29, 2016 00:39 IST

सामान्य जनतेच्या ज्वलंत समस्या घेऊन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भीमशक्ती जिल्हा चंद्रपूरच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

चंद्रपूर : सामान्य जनतेच्या ज्वलंत समस्या घेऊन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भीमशक्ती जिल्हा चंद्रपूरच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बाबुपेठ येथून जिल्हा अध्यक्ष एन.डी. पिंपळे व अ‍ॅड. एम.पी. तेलंग, श्यामराव खंडारे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे व शिक्षणात समानता निर्माण करावी, मान्यताप्राप्त शाळांना अनुदान देण्यात यावे, बीपीएलधारकांना वीज वितरण कंपनीद्वारे १०० युनिटपर्यंत ८७ पैसे प्रति युनीट दर निर्धारित करून त्याची अंमलबजावणी करावी, कंत्राटी पद्धती बंद करून कामगारांना स्थायी करण्यात यावे, बीपीएल कुटुंबास शासकीय योजनेतून मिळालेल्या घरकुलांचा गृहकर कमी करण्यात यावा, एस.टी,एन.टी., ओबीसी प्रवर्गातील बीपीएल कुटुंबांना घरकूल मंजूर करावे, मंजूर असलेल्या लेआऊटवरील झोपड्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे, डॉ. आंबेडकर वॉर्डाच्या जागेचा सर्व्हे करून लेआऊट मंजूर करण्यात यावा. आदी मागण्यांसाठी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.भीमशक्तीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना भेटून त्यांच्या मार्फतीने मागण्याचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठविण्याचे व स्थानिक समस्या सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी शिष्टमंडळास दिले.शिष्टमंडळात एन.डी. पिंपळे, अ‍ॅड. एम.पी. तेलंग, सुभाष खाडे, शामराव खंडारे यांचा समावेश होता. मोर्चा यशस्वी करण्यासाठी संजय राऊत, प्रदीप केवटे, पियुश धुपे, गोपाल बरिया, प्रशांत मावलीकर, अमीत ताकसांडे, चरणदास दुर्गे, महेश उईके, प्रवीण ठाकूर, प्रदीप नरवाडे, दयाल शेंडे यांनी प्रयत्न केले. (शहर प्रतिनिधी)