शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गायमुखच्या यात्रेत भाविकांची मंदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:14 IST

गायमुख येथे मकर संक्रांतीच्या पर्वावर भरलेल्या यात्रेदरम्यान हजारो भाविकांनी जागृत मारूतीचे दर्शन घेऊन गायमुखच्या कुंडात पवित्र स्नानही केले.

घनश्याम नवघडे ।आॅनलाईन लोकमतनागभीड : गायमुख येथे मकर संक्रांतीच्या पर्वावर भरलेल्या यात्रेदरम्यान हजारो भाविकांनी जागृत मारूतीचे दर्शन घेऊन गायमुखच्या कुंडात पवित्र स्नानही केले.मागील अनेक वर्षांपासून गायमुख येथे मकर संक्रांतीच्या पर्वावर यात्रा भरत आहे. नागभीड तालुक्यातील बाळापूरजवळ हे स्थळ असून या ठिकाणी पश्चिम मुखी मारूतीचे मंदिर आहे. बाजूलाच असलेल्या एका छोट्याशा टेकडीतून पाण्याचा झरा अविरत वाहत असतो. या ठिकाणी गायीचे मुख बसविण्यात आले आहे. म्हणूनच या ठिकाणाला गायमुख हे नाव पडले असावे. वाहणाºया या झºयाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून स्नानासाठी दोन कुंड तयार करण्यात आले आहेत. यात स्त्रिया आणि पुरूषांची वेगवेगळी सोय आहे.विशेष म्हणजे, या ठिकाणी वर्षभरच भाविकांची गर्दी असते. पण मकर संक्रांतीला या ठिकाणी यात्राच भरत असते. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील भाविक या यात्रेत हजेरी लावत असून येथील कुंडात स्नान करीत असतात. संपूर्ण जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही या स्थळाची ख्याती असली तरी या स्थळाचे व्यवस्थापन करण्यासाठी अद्यापही विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात आले नाही. हे स्थळ अजूनही खासगी मालकीचे आहे. त्यामुळेच या स्थळाचा विकास झाला नाही.पोलीस बंदोबस्त चोखहे स्थळ तळोधी पोलीस ठाण्यातंर्गत आहे. येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन तळोधी ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही .तिर्थ म्हणून उपयोगझऱ्याच्या माध्यमातून गोमुखातून पडणाºया पाण्याचा उपयोग परिसरातील लोक तिर्थ म्हणून करीत असतात. पिकांवर येणाऱ्या विविध ,रोगराईवर हे तिर्थ गुणकारी आहे, असा समज असून या तिर्थाची पिकांवर फवारणीही करीत असतात.या देवस्थानावर खासगी मालकी हक्क असले तरी ते लोकभावनेचे प्रतिक आहे. या स्थळाचा विकास व्हावा. एवढेच नाहीतर तीर्थस्थळाचा दर्जा मिळावा, अशीही नागरिकांची इच्छा आहे. या प्रभागाचा जि.प.सदस्य या नात्याने ही लोकभावना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांपर्यंत पोचवून या स्थळाच्या विकासासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे.- संजय गजपुरे, जि.प.सदस्य बाळापूर - पारडी