शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनशून्यतेमुळे रखडला पकडीगुडमचा विकास

By admin | Updated: November 15, 2014 01:30 IST

शेतकऱ्यांना सिंचनासाठी वरदान ठरलेला पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प नियोजनशुन्यता व प्रशासकीय अनास्थेमुळे कुचकामी ठरला आहे.

वनसडी : शेतकऱ्यांना सिंचनासाठी वरदान ठरलेला पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प नियोजनशुन्यता व प्रशासकीय अनास्थेमुळे कुचकामी ठरला आहे. उद्योगाव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणीच पोहचत नसल्याने प्रकल्पाच्या हेतुलाच हरताळ फासला जात आहे. या प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीकडे संबंधित अधिकाऱ्याच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे येथील विकास रखडला आहे.सद्या रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून शेतात गहू, ज्वारी, हरभरा तसेच कपाशीचे पीक आहे. दरवर्षी सदर धरणातून कालव्याद्वारे पाणी शेतापर्यंत पोहचविले जाते. यासाठी कालव्यांची स्वच्छता सिंचन विभाग करीत असते. मात्र येथील दोन्ही कालवे अद्यापही स्वच्छ करण्यात आले नाहीत. कालव्यात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असल्याने पाण्याचा पुरवठा होईल की नाही, याबाबत सांशकताच आहे. काही ठिकाणी तर कालवा कोरडा पडल्याचे दिसून येते. कागदोपत्री कालवे स्वच्छ झाले असल्याचे दाखविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. येथील प्रकल्पाचे कार्यालय गडचांदूरला असल्याने तेथून कारभार सुरू आहे. तालुक्यातील अमलनाला सिंचन प्रकल्प व या प्रकल्पाची धुरा एकाच शाखा अभियंत्याावर आहे. अमलनाला धरणासोबतच पकडीगुडमचीही प्रभारी धुरा सांभाळत असल्याने प्रकल्पाकडे पाहिजे तेवढे लक्ष देणे शक्य होत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे सिंचन कालव्याच्या पाण्याद्वारे होते. परंतु शेतात पीक वाढत असताना मात्र कालव्याद्वारे पाणी उपलब्ध होत नसल्याने पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. उद्योगासाठी सिंचन विभाग नियमित पाणीपुरवठा करीत असताना शेतकऱ्यांना मात्र सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आसहे. यापूर्वी या प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी कोट्यवधी खर्च करण्यात आला. परंतु हजारो हेक्टरवरील शेतपिके सिंचनापासून वंचित आहे, हे वास्तव आहे. या प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. प्रकल्प निर्मितीनंतरही अनेक वर्षे लोटूनही याठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. कालव्यांनाही खड्डे पडले असल्याने पाणी वाया जात आहे. (वार्ताहर)