शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

By admin | Updated: March 6, 2016 00:32 IST

फेब्रुवारी महिन्यात सतत तीन दिवस आणि शुक्रवारी पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

अवकाळी पाऊस : शासनाकडून नुकसानभरपाईची अपेक्षाचंद्रपूर : फेब्रुवारी महिन्यात सतत तीन दिवस आणि शुक्रवारी पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच गारपीट आणि वादळही सुटले. परिणामी हातात येणारा रबी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. या अवकाळी पावसाचा जवळजवळ सर्वच तालुक्यात थोडाअधिक फटका बसून हजारो हेक्टरवरील रबी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण करावे, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ५० ते ६० टक्के उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले. लागवड खर्चही न निघाल्याने शेतकरी यंदा कर्जफेड करू शकला नाही. अशातच शेतकऱ्यांनी डोक्यावर कर्ज असतानाही आणखी दुसऱ्यांकडून हातउसणे पैसे घेत रबीची मशागत सुरू केली. हरभरा, ज्वारी, गहू, मका, मूग, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात. मागील वर्षी जिल्ह्यात एक लाख १५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना रबीतून उत्पादनही बऱ्यापैकी झाले होते. यावर्षीदेखील एक लाखांहून अधिक हेक्टरवर रबीचे कृषी विभागाने नियोजन केले होते. रबी हंगामात सर्वाधिक पेरणी वरोरा उपविभागात होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज होता. वरोरा उपविभागात वरोरा, भद्रावती, चिमूर या तालुक्यांचा समावेश आहे. या उपविभागात ५२ हजार ६९० हेक्टर क्षेत्रावर रबी पीक पेरणीचे कृषी विभागाने नियोजन केले होते. मात्र कृषी विभागाचे हे नियोजन शेतकऱ्यांनी फोल ठरविले. यावर्षी रबीत मागील वर्षीच्या तुलने निम्म्यावरही पिकांची पेरणी झाली नाही. जिल्ह्यात केवळ ६५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली. यंदा पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊसच झाला नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार याची आधीपासूनच भीती होती. ती खरीही ठरली. रबीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांना पीक जगविताना तारेवरची कसरत करावी लागली. मोठ्या आशेने आणि हिंमतीने पिकांची जोपासणा करीत शेतकऱ्यांनी कसेबसे पिक पिकविले. त्यातही यंदा हिवाळा सुरू होऊनही थंडी पडली नाही. अगदी शेवटी जानेवारी महिन्यात थोडीफार थंडी पडली. मात्र तेही काही दिवसात लोपली. त्यामुळे गहू, हरभरा या पिकांची वाढच खुंटली. आता शेतकऱ्यांच्या हातात रबी पिके येऊ लागली आहेत. काही शेतकऱ्यांनी गहू, लाखोळी तोडून शेतातच वाळू टाकली होती. मात्र मध्येच फेब्रुवारी महिन्यात आणि आता काल अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. काल शुक्रवारी विजांचा कडकडाटासह वादळी पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील चिमूर, राजुरा, जिवती, मूल, सावली, चंद्रपूर, कोरपना, बल्लारपूर, नागभीड तालुक्यात वादळासह पाऊस बरसला. तर भद्रावती, ब्रह्मपुरी तालुक्यात ढगाळ वातावरण व वादळ सुटले होते. या पावसामुळे पुन्हा रबी पिकांना जोरदार फटका बसला आहे. कृषी किंवा महसूल विभागाने अद्याप सर्वेक्षण केले नसले तरी हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (शहर प्रतिनिधी)तत्काळ सर्वेक्षण व्हावेजिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रबी पिकांचे नुकसान झाले. काही पिके कापून शेतातच ढिग करून असल्याने तेदेखील पाण्यामुळे खराब झाले. शेतकऱ्यांच्या आमराईतील मोहरही वादळामुळे झडला. या नुकसानीचे कृषी किंवा महसूल विभागाने तत्काळ सर्वेक्षण करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.