शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

शासकीय कार्यालयाचे बांधकाम पूर्ण होऊनही त्यांना लोकार्पणाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:38 IST

जुन्या इमारती धोकादायक : नवीन इमारती बनून तयार पण उद्घाटनाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शासकीय कार्यालयाला अद्ययावत इमारती मिळाव्या, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून इमारतीचे बांधकाम केले आहे. परंतु, बहुतांश इमारतीचे काम पूर्ण होऊनही त्यांना लोकार्पणाची प्रतीक्षा लागली आहे. यामध्ये कोरपना तालुक्यातील तालुका वैद्यकीय कार्यालयाची इमारत यासह विविध कार्यालयाचा समावेश आहे.

जिल्ह्यात वनविभाग, महावितरण कंपनी, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय महसूल अधिकारी, तहसील, आदिवासी विकास प्रकल्प, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आदी कार्यालयांसह अनेक शासकीय कार्यालय आहेत.

यातील काही कार्यालयांच्या इमारती या भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. तर काही शासकीय कार्यालयांच्या इमारती जुन्या झाल्यामुळे मोडकळीस आल्या होत्या. त्यामुळे संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. काही कार्यालयांच्या नवीन इमारतींचे बांधकामसुद्धा पूर्ण झाले. यापैकी काही कार्यालये नवीन इमारतीत शिफ्टसुद्धा झाली आहेत. 

चंद्रपूरचे वैद्यकीय महाविद्यालय प्रगतिपथावरचंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम बंगाली कॅम्प ते बाबूपेठ मार्गावर सुरू असून ते प्रगति- पथावर आहे.

जुनी कार्यालये धोकादायक इमारतींत जिल्ह्यातील बहुतांश कार्यालये जीर्ण झाली आहेत, त्यामुळे त्या धोकादायक स्थितीत आहेत. काही शाळांतील वर्गखोल्यांचा समावेशही यात आहे. त्याचे निर्लेखन करून नव्या इमारतीचे बांधकाम करणे गरजेचे आहे.

अपुऱ्या जागेमुळे नव्या इमारतींसाठी प्रस्ताव जिल्ह्यातील बहुतांश शासकीय इमारती जीर्ण झाल्या आहेत. तर काही कार्यालयात कामकाजासाठी जागा अपुऱ्या दिसून येतात. त्यामुळे नव्या इमारतींसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. परंतु, निधीअभावी ते प्रस्ताव रखडल्याची माहिती आहे.

उद्घाटनाला मुहूर्त का मिळेना? जिल्ह्यातील बहुतांश इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, त्या इमारतीच्या उ‌द्घाटनाला मुहूर्तच मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

बहुतांश इमारतीचे बाधकाम सुरू जिल्ह्यातील बहुतांश शासकीय इमारतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. निधी आल्यामुळे त्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. यात बसस्थानक, शाळेतील वर्गखोल्या आदींचा समावेश आहे

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर