शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

14 व्या वित्त आयोगाचा निधी असूनही थकीत वीज देयकांचा ताळमेळ जुळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

महावितरणने दर्शविलेल्या थकबाकीमध्ये ग्रामपंचायतींशिवाय इतर कार्यालये, खासगी व्यक्ती व संस्था इत्यादींच्या थकीत देयकांचा समावेश असल्याचे पुढे आले. परिणामी, ग्रामपंचायतींची निव्वळ थकबाकी किती याबाबत सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. थकबाकीपोटी १४ व्या वित्त आयोगातून व नियमित अनुदानातून अदा केल्या जाणाऱ्या रकमा कशाप्रकारे संबंधित ग्रापंच्या देयकांमध्ये समायोजित केल्या, हाही प्रश्न पुढे आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपरिषदांच्या हद्दीतील पथदिवे व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची देयके थकीत असल्याने महावितरणने नोटिसा बजावल्या. दरम्यान, १४ व्या वित्त आयोगातून खर्चाची तरतूद झाली; मात्र देयकांचा ताळमेळ जुळत नसल्याने सरपंच व ग्रामसेवक पेचात सापडले आहेत. जिल्हा समितीच्या अभ्यास अहवालाला बराच कालावधी लागणार असल्याने अनेक गावांना अंधारात दिवस ढकलावे लागणार आहेत.जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपरिषदांच्या हद्दीतील पथदिव्यांसोबतच ग्रामीण पाणीपुरवठा योजनाही सुरू आहेत. या प्रकल्पांचे कोट्यवधींचे वीज देयक थकीत आहे. महावितरण देयक वसुलीसंदर्भात नोटिसा बजावल्यानंतर शासनाने १४ व्या वित्त आयोगातून हा खर्च करण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र महावितरणने दर्शविलेल्या थकबाकीमध्ये ग्रामपंचायतींशिवाय इतर कार्यालये, खासगी व्यक्ती व संस्था इत्यादींच्या थकीत देयकांचा समावेश असल्याचे पुढे आले. परिणामी, ग्रामपंचायतींची निव्वळ थकबाकी किती याबाबत सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. थकबाकीपोटी १४ व्या वित्त आयोगातून व नियमित अनुदानातून अदा केल्या जाणाऱ्या रकमा कशाप्रकारे संबंधित ग्रापंच्या देयकांमध्ये समायोजित केल्या, हाही प्रश्न पुढे आला. असा प्रकार जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात घडल्याने शासनाने थकबाकीचा ताळमेळ जुळविण्यासाठी ग्रामविकास व पंचायत विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. अशाच प्रकारची जिल्हा समितीही गठीत करण्याच्या सूचना जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या. निधी उपलब्ध आहे; मात्र अहवाल येईपर्यंत सुमारे ३५ पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या वीज देयकांचा तिढा कायम राहणार आहे.

अशी आहे त्रिसदस्यीय समिती- जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सदस्यपदी महावितरणचे अधीक्षक अभियंता (विद्युत) व सदस्य सचिवपदी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांचा समावेश आहे. नगरपंचायत व नगरपालिका स्तरावर जिल्हा प्रशासन अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. 

समिती काय तपासणार? यापूर्वी पथदिवे, पाणीपुरवठा योजनेच्या वीज देयकांचा भरणा कुठून करण्यात आला, ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपालिकांचे स्वत:शिवाय अन्य मीटरचा तपशील, महावितरणने थकबाकी दर्शविलेल्या बिलांचा ताळमेळ ग्रामपंचायत व महावितरणकडून प्राप्त करून त्याचा तपशील राज्य समितीला सादर करेल. निधी उपलब्ध आहे; मात्र या प्रक्रियेला बराच कालावधी लागणार आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण