शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आगीपासून प्रकल्‍पाच्‍या इमारतींचे पूर्णपणे संरक्षण व्‍हावे याचा सखोल अभ्‍यास करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST

चंद्रपूर : चिचपल्‍ली येथील बांबू शिक्षण व प्रशिक्षण केंद्र हा चंद्रपूर जिल्‍ह्याचा गौरव जागतिक पातळीवर व्‍हावा अशा पध्‍दतीचा प्रकल्‍प ...

चंद्रपूर : चिचपल्‍ली येथील बांबू शिक्षण व प्रशिक्षण केंद्र हा चंद्रपूर जिल्‍ह्याचा गौरव जागतिक पातळीवर व्‍हावा अशा पध्‍दतीचा प्रकल्‍प आहे. रोजगार निर्मितीच्‍या प्रक्रियेमध्‍ये हा प्रकल्‍प निश्चितच मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्‍पाच्‍या उभारणीच्‍या कामात कोणतीही चूक होता कामा नये, भविष्‍यात आगीपासून प्रकल्‍पाच्‍या इमारतींचे पूर्णपणे संरक्षण व्‍हावे याचा सखोल अभ्‍यास करुन त्‍यादृष्‍टीने उपाययोजना कराव्या, अशा सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख, माजी अर्थ व वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

मंगळवारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चिचपल्‍ली येथील बांबू संशोधन केंद्राला भेट देत पाहणी केली. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या ज्‍या समस्‍या आहेत, त्‍यासंबंधी एक सादरीकरण तयार करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या. सदर सादरीकरण केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्‍या समक्ष करून हे केंद्र आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे व्‍हावे यादृष्‍टीने आपण प्रयत्‍न करणार असल्‍याचे सांगून पुन्‍हा नव्‍याने इमारत उभारताना जरी सिमेंटची उभारली तरीही त्‍याचे दर्शनिय स्‍वरुप बांबू सारखे असावे, असेही ते म्हणाले. यासाठी आवश्‍यक निधीची मागणी विभागाने करावी, आपण त्‍याचा पाठपुरावा करु असे आ. मुनगंटीवार म्‍हणाले. यावेळी चंद्रपूर वनवृत्‍ताचे मुख्‍य वनसंरक्षक प्रविण, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्‍या संचालक अपर्णा, सार्वजनिक बांधकाम मंडळाच्‍या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता भास्‍करवार, भाजपा नेते रामपाल सिंह, जिल्‍हा परिषद सदस्‍य गौतम निमगडे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.