शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

चंद्रपुरातील नद्यांमध्ये उदासीनतेचा कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 5:00 AM

मात्र चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून वाहणाºया झरपट नदीचा तर नालाच झाला आहे. इरई नदी थोडीफार स्वच्छ करण्यात आली. मात्र आता उदासीनतेमुळे तीदेखील पुन्हा अस्वच्छ होत आहे. आता महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने झरपट नदी वाचविण्यासाठी व्यापक अभियान राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देझरपट नदीचा झाला नाला : मनपा व जिल्हा प्रशासनाने राबवावे अभियान

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर व परिसरातील अनेक गावांना जीवन देणारे चंद्रपुरातील जलस्रोत चंद्रपूरकरांनीच घाण केले. तहान भागविणाऱ्या या नद्यांविषयी कृतज्ञता बाळगण्याऐवजी नागरिकच कृतघ्न झाले. वेकोलिचे ओव्हरबर्डन, नागरिकांचे अतिक्रमण व दिवसागणिक वाढत जाणारा गाळ, यामुळे या नद्यांचे नैसर्गिक सौंदर्यच बाधित झाले. शहराच्या मधोमध नदी वाहणे म्हणजे खरे तर शहराचे भाग्यच. मात्र चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून वाहणाºया झरपट नदीचा तर नालाच झाला आहे. इरई नदी थोडीफार स्वच्छ करण्यात आली. मात्र आता उदासीनतेमुळे तीदेखील पुन्हा अस्वच्छ होत आहे. आता महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने झरपट नदी वाचविण्यासाठी व्यापक अभियान राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.झरपट नदी पूर्वी चंद्रपूरची जीवनदायिनी होती. मात्र या नदीचा डोळ्यादेखत नाला करून टाकला आहे. झरपट नदी वाचविण्यासाठी एकाही राजकीय नेत्याने वा प्रशासकीय अधिकाऱ्याने धडपड केली नाही. उलट ती प्रदूषित करणाऱ्यांकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. शहरातील ज्या भागात नदीच्या प्रवाहाने स्पर्श करून पवित्र केले, तेथील पावित्र्य कायम न राखता सांडपाणी नदीत सोडण्यात आले. याशिवाय शहरातील सुमारे ६० टक्के मलवाहिन्या झरपटमध्येच विलीन करून तत्कालीन राज्यकर्त्यांनी संपूर्ण नदीचे वाटोळे केले आहे.१५ कि.मी. एवढी कमी लांबी असतानाही या नदीचे प्रशासन जतन करू शकले नाही. उलट नदीची गटारगंगा कशी करता येईल, याचाच पध्दतशीर प्रयत्न झाला. या नदीतून वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला. पात्रातील बारिकसारिक खडकंही गायब करण्यात आले. आता तर नदीपात्रात अनेक ठिकाणी वाळूच दिसत नाही. वाळूऐवजी चिखल, घराघरातून आणि नालीतून आलेल्या मळाचे साम्राज्य दिसते. शहरातील बंगाली कॅम्प, तुकूम, अंचलेश्वर गेट, संतोषी माता मंदिर परिसर, ताडबन परिसर, हनुमान खिडकी परिसर, पठाणपुरा वार्ड या भागातील सांडपाणी नदीत सोडले जाते. मच्छीनाल्याचेही काही पाणी रामाळा तलावात जाते आणि बाकी सर्व पाणी झरपट नदीतच मिसळते. याशिवाय शहरातील कचरा, निर्माल्य, प्लास्टिक पिशव्याही नदीतच टाकल्या जातात.प्रदूषण नियंत्रण मंडळ नावाचे कार्यालय आणि त्यातील अधिकारी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत आहेत, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. वायू प्रदूषणासोबतच जलप्रदूषणाचेही स्वरुप भयंकर झाले आहेत. तरीही याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाला काही सोयरसूतक असल्याचे आजवर कधीच दिसले नाही. कारवाई करायला तक्रारीची प्रतीक्षा करणाºया या खात्याकडून आता झरपट नदीचे प्रदूषण रोखणे शक्य होणार का, हाही प्रश्नच आहे.यात्रेकरुंना झरपटचाच आधारविशेष म्हणजे, शहरातील सुमारे ६० टक्के मलवाहिन्या पूर्वीपासून झरपट नदीतच विलीन करण्यात आल्या आहेत. या नदीत प्राणवायूचे प्रमाण अत्यंत कमी आणि सल्फेट, हेवी मेटल अशा घातक रसायनाचे प्रमाण अधिक आढळून आले होते. अर्थात, कोणत्याही परिस्थितीत झरपट नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही, हे स्पष्टच आहे. चंद्रपुरातील महाकाली यात्रा राज्यभर प्रसिध्द आहे. राज्यभरातील भाविक या यात्रेसाठी चंद्रपुरात येतात. महाकाली यात्रेसाठी येणाºया भाविकांना आंघोळीसाठी याच झरपट नदीच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो.इरईचे खोलीकरण थांबलेइरई नदी परिस्थिती याहून वेगळी नाही. या नदीचे तर नैसर्गिक पात्रच वेकोलिने बदलवून टाकले. इरई वाचावी म्हणून काही पर्यावरणवाद्यांनी नदी पात्रातच बसून आंदोलन केले. अनेक वर्षानंतर प्रशासन जागे झाले. काही वर्षांपूर्वी इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. मात्र हे काम मध्येच थांबविल्याने ते अपूर्णच आहे. बल्लारपूर पेपरमीलमधील रसायनयुक्त पाणी या नदीत सोडल्यामुळे नदीचे पात्रच काही ठिकाणी विषाक्त झाले आहे.सामाजिक संस्थांनीही पुढे यावेजिल्ह्यात नानाविध संस्था सामाजिक कार्य करीत आहेत. चंद्रपूर जिल्हा प्रदूषित जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. विविध मुद्यांवर या संस्थांनी आजवर आंदोलने केली आहेत. मात्र जिल्ह्यातून वाहणाºया नद्या आणि प्रदूषणामुळे त्यांची होत असलेली वाताहात त्यांना अंतर्बाह्य अस्वस्थ करीत नाही. त्यामुळेच यासाठी एकही संस्था दमदार आंदोलन उभे करू शकली नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडला जातो. मात्र वाहती नदी डोळ्याआड करून तिचे वाटोळे होत असतानाही जीवनदायिनींना वाचविण्यासाठी प्रशासनाला गदगद हालविले जात नाही. काही ध्येयवेड्या लोकांनी आपआपल्या परीने थोडेफार प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना पुढाºयांची आणि प्रशासनाची फारशी साथ मिळाली नाही.