शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

कर्जमाफीची रक्कम नवरात्रीपूर्वी जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:00 IST

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम नवरात्री पूर्वी शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा करावी, ....

ठळक मुद्देशिवसेनेचे धरणे : जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम नवरात्री पूर्वी शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा करावी, यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली, कर्जमाफीवर मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र जाहीर केलेल्या या कर्जमाफीची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकºयांचे हाल सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यामुळे शिवसेनेने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. आंदोलनादरम्यान संपर्क प्रमुख तथा आमदार बाळू धानोरकर यांनी, सरकारने नवरात्री पूर्वी शेतकºयांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली नाही तर या सरकारला बुद्धी यावी यासाठी सदबुद्धी यज्ञ केला जाईल, असे ते म्हणाले. शेतकरी हा दिवसभर शेतामध्ये राबत असतो आणि सरकारच्या आॅनलाईन कर्जमाफीच्या अर्जामुळे व नवनवीन नियमांमुळे सेतू मध्ये रात्र-रात्र काढून अर्ज भरत आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. जोपर्यंत शेतकºयांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख ९० हजार शेतकरी आहेत. त्यापैकी फक्त २६० शेतकºयांना १० हजार रुपयाची अग्रीम रक्कम देऊन शासनाने शेतकºयाची थट्टा केली आहे, असे शिवसेना विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार म्हणाले. कर्जमाफीवर राज्याचे मुख्यमंत्री म्हणत असतात अभ्यास चालू आहे. हा अभ्यास कधी पर्यंत चालू राहणार? अभ्यास असाच चालू असणार असेल तर शेतकºयांवर उपासमारीची वेळ येणार आहे, असेही ते म्हणाले.चंद्रपूर शहर प्रमुख सुरेश पचारे यांनी आंदोलनाचे प्रास्ताविक केले. संचालन शिक्षकसेना जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांनी केले. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे, संदीप गिºहे, भारती दुधानी, विजयालक्ष्मी रोगे, सिक्की यादव, माया पटले, नगरसेवक विशाल निंबाळकर, रवींद्र लोनगाडगे, मनोज पाल, कुसूम उदार, विलास डांगे, बबन उरकुडे, सतीश संकुलवार, भास्कर ताजने, सरीता कुडे, जीवन बुटले, यांच्यासह शिवसैनिक या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.