वरोरा: येथून जवळच असलेल्या खांबाडा येथे दिवाळीसाठी आलेल्या अभियंता युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. वैभव अशोक हिवरे(२२) खांबाडा असे मृत युवकाचे नाव आहे.वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील अशोक हिवरे यांना वैभव व गौरव अशी दोन मुले होते. वैभव इंजिनिअर तर गौरव बीएएमएस नागपूर येथे करीत आहे. वैभव हा बंगलोर येथील कंपनीतील नोकरी सोडून नुकताच नागपूर येथील खासगी कंपनीत रुजू झाला. दिवाळीनिमित्त तो खांबाडा येथे आला होता. त्याला ताप आल्याने प्रथम हिंगणघाट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर खांबाडा येथे आणण्यात आले. त्यांनतर पुन्हा त्याची प्रकृती बिघडल्याने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ८ नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. (तालुका प्रतिनिधी)
दिवाळीसाठी आलेल्या अभियंत्याचा डेंग्यूने मृत्यू
By admin | Updated: November 9, 2014 22:29 IST